किकवारी बुद्रुक : किकवारी बुद्रुक परिसरात फेब्रुवारी महिन्यातच विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे उशिरा लागवड झालेल्या कांद्याचे पीक पाण्याअभावी करपू लागले आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची समस्याही (Drinking Water Crisis) गंभीर बनत चालली आहे. अनेक वाड्यापाड्यांना लवकरच टॅंकरची गरज भासणार आहे. (Nashik Water Crisis Kikwari area Farmers struggle marathi news)
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे कांदारोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्यामुळे कांदा लागवड जानेवारीपर्यंत चालू होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिवसभर चालणाऱ्या विहिरी आता जेमतेम एक दोन तासावरच आल्या आहेत. त्यामुळे उशिरा लागवड झालेले कांद्याचे क्षेत्र पाण्याअभावी सोडून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.
गेल्या चार- पाच दिवसापासून ढगाळ वातावरण व उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. रब्बीची पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परिसरातील शेती व्यवसाय हा डोंगरावर पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. (Latest Marathi News)
निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने भाजीपाला- फळबाग कांद्याचे पीक होरपळू लागले आहे. सतत पाणी देणे गरजेचे असताना ऐन पीक बहाराच्या वेळीच विहिरींनी तळ गाठल्याने चिंता अधिक वाढली आहे.
जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे, गेल्या चार ते पाच दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे, रात्री गारवा असतो आणि सकाळी ढगाळ वातावरणामुळे कडक उन्हाची तीव्रता जाणवत आहे. परिसरात विहिरींनी तळ घातल्याने विहिरींचे गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.