Nashik Water Management: 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी कसरत! उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन

हिवाळ्याचा गारवा कमी होऊन उन्हाचे चटके जाणवू लागल्यानंतर आता पाणीपुरवठा विभागाकडून धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन सुरू झाले आहे.
Nashik Water Management: 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी कसरत! उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन
Updated on

Nashik Water Management : हिवाळ्याचा गारवा कमी होऊन उन्हाचे चटके जाणवू लागल्यानंतर आता पाणीपुरवठा विभागाकडून धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन सुरू झाले आहे. शहरासाठी राखीव ठेवलेल्या एकूण पाण्यात अठरा दिवसांची तूट आहे.

ती तूट भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात कमी-अधिक पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून नाशिककरांवर सरसकट पाणीकपात न लादण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहे.

सद्यःस्थितीत रोजचा पाणी वापर ५५५ दशलक्ष लिटर्स असून, धरणांमध्ये दोन हजार ९३९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. निवडणूक वर्ष असल्याने पाणीकपात परवडणार नसल्याने नाशिककरांची कपातीतून सुटका होणार आहे. (Nashik Water Management make up for 18 day shortfall Planning by Water Supply Department in summer nmc)

मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८. ६ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाण्याची बचत झाली असली तरी त्यापूर्वी जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले.

त्यामुळे नाशिक महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्यात आली. नाशिक महापालिकेकडून पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली होती.

परंतु धरणांमधील उपलब्ध पाणी साठ्याची उपलब्धता लक्षात घेता पाणी आरक्षणात कपात करण्यात आली. नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षीत करण्यात आले. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होत आहे.

सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा दिवसांचे पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण होत आहे. अठरा दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव पाणीकपातीला विरोध केल्याने मागे पडला.

जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांचा दोनदा दौरा झाला. त्याशिवाय विरोधी पक्षांचे नाशिकमध्ये अधिवेशन झाल्याने कपात करण्यात टाळाटाळ झाली आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावर पाणी कपात परवडणारी नाही, सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी अंगावर येण्याची भीती असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपात करण्यास टाळाटाळ होत आहे.

त्यामुळे अठरा दिवसांचा शॉर्ट फॉल कमी करण्यासाठी प्रशासनाकडून कमी-अधिक पुरवठा करून शॉर्टफॉल भरून काढण्याचे प्रयत्न आहे. मात्र पाणी कपात करण्याचा कुठलाही विचार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nashik Water Management: 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी कसरत! उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन
NMC News : घरपट्टी देयेकांसाठी महापालिकेचे Android App!

शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफुटात)

- गंगापूर धरण- ३८०७

- दारणा व मुकणे धरण- १५०७

- एकूण आरक्षण- ५३१४

पाण्याचा वापर (दशलक्ष घनफूट)

- १५ ते ३१ ऑक्टोंबर- ३३४.६५

- एक ते ३० नोव्हेंबर- ५९३.६७

- एक ते ३१ डिसेंबर- ५९५

- एक ते ३१ जानेवारी- ६११.२७

- एक ते १२ फेब्रुवारी- २४०.१३

----------------------------------

एकूण वापर- २३७४.१२

----------------------------------

एकूण शिल्लक पाणी- २९३९.२६ दशलक्ष घनफूट.

-----------------------------------

दररोजचा पाणी वापर- ५५५.८ दशलक्ष लिटर्स.

---------------------------------------

Nashik Water Management: 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी कसरत! उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन
Nashik NMC News: 10 हजार पदांचा आकृतिबंध अंतिम टप्प्यात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()