Nashik Water Management: पाणीकपात टाळायची असेल, तर चर खोदा! जलसंपदा विभागाचा महापालिकेला सल्ला

Water Resources Department of Maharashtra
Water Resources Department of Maharashtraesakal
Updated on

नाशिक : मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणात नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर जलसंपदा विभागाने नाशिकसाठी पाणी आरक्षण जाहीर केले आहे.

त्यात ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. पाणी कपात होवू नये यासाठी गंगापूर धरणातील ६०० दशलक्ष घनफूट पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे पाणी आरक्षण निश्‍चित करताना १३५ लिटर प्रतिमाणसी निश्‍चित करण्यात आले. (Nashik Water Management to avoid water scarcity dig ditches Advice to nmc of Water Resources Department)

पावसाने ओढ दिल्याने मेंढीगिरी समितीच्या अहवालाचा आधार घेत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले.

याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतरही नाशिक व नगरच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

१५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी महापालिकेने गंगापूर धरण समूहातून ४४००, मुकणे धरणातून १६०० तर दारणा धरणातून १०० असे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली.

परंतु जायकवाडीला पाणी सोडल्याने पाणी आरक्षणात कपात करत ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली.

जलसंपदाने महापालिकेच्या ६१०० पाणी आरक्षण मागणीवर आक्षेप घेत ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले.

त्यामुळे मागील वर्षी शहरासाठी ५७५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाल्याने तेवढेच पाणी आरक्षण नाशिकसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. ती मागणीदेखील आता नव्या सूचनेत फेटाळली आहे.

Water Resources Department of Maharashtra
Nagpur Water Supply: नागपुरकरांसाठी महत्वाची बातमी! विविध भागांमध्ये 'या' तीन दिवशी राहणार पाणी पुरवठा बंद

चर खोदण्यासाठी सर्वेक्षण

वास्तविक जायकवाडी धरणात चर खोदल्यानंतरदेखील तेथे पाणी उपलब्ध होवू शकते. परंतु जलसंपदा विभागाकडून गंगापूर धरणात चर खोदण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

धरणाची पाणी पातळी ५९८ मीटरपर्यंत पोचल्यास जॅकवेलपर्यंत पाणी पोचत नाही. त्यामुळे चर खोदणे आवश्यक ठरते. शहरात पाणीकपात लागू करायची नसेल तर चर खोदण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

असे असेल आरक्षण

- गंगापूर धरण समूह- ३८०७ दशलक्ष घनफूट.

- दारणा व मुकणे धरण समूह- १५०७ दशलक्ष घनफूट.

Water Resources Department of Maharashtra
Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणी शिल्लक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()