Nashik News : स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवर पाण्याचे तळे; पादचाऱ्यांसह वाहनचालकांची तारांबळ

Nashik : चौकात, सिग्नलवर रस्त्याच्या मध्यभागी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून तळे तयार झाले आहेत.
Stagnant water at Tapovan corner on Mumbai-Agra highway. Also the ponds formed due to accumulation of rain water in front of Vajreshwari Nagar on Dindori Road.
Stagnant water at Tapovan corner on Mumbai-Agra highway. Also the ponds formed due to accumulation of rain water in front of Vajreshwari Nagar on Dindori Road.esakal
Updated on

Nashik News : शहरात शुक्रवार (ता.२) पासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पंचवटीत अनेक ठिकाणी रस्त्यावर, चौकात, सिग्नलवर रस्त्याच्या मध्यभागी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून तळे तयार झाले आहेत. रस्त्यावरील तळ्यांमुळे दुचाकी चालकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. रस्त्याने चालताना तळ्यातील पाण्यातून वेगाने वाहन गेल्यास पादचाऱ्यांचे कपडे खराब होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. (Water ponds on roads of smart city pedestrians and motorists )

तसेच अशावेळी समोरून येणाऱ्या वाहनाबरोबरच शेजारील वाहनावरही लक्ष ठेवावे लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देत समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता, चौक, सिग्नल, रस्ता दुभाजक, फुटपाथ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेला योग्य प्रमाणात उतार दिला नसल्याने व उताराच्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी चेंबर नसल्याने व काही ठिकाणी उताराच्या ठिकाणी नियोजन केलेले नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

पंचवटीतील जुना आडगाव नाका, मखमलाबाद रोड, क्रांतीनगर, ड्रीम कॅसल चौक, मालेगाव स्टॅन्ड, दिंडोरी रोड, औरंगाबाद नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, नाग चौक, गजानन चौक, सरदार चौक, पेठ नाका, रामवाडी, हनुमान वाडी, निमाणी, सेवा कुंज, अमृतधाम चौक, पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डसमोरील परिसर, मेहेर धाम, तारवाला नगर, मेरी, म्हसरूळ, हिरावाडी रोड, कार्यसिद्धी चौक, नांदूर नाका, आडगाव, जत्रा हॉटेल चौक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मार्गावर अनेक ठिकाणी, चौका चौकात रस्त्याच्या मधोमध, रस्त्याच्या कडेला पाण्याचे तळे साचत आहे. (latest marathi news)

Stagnant water at Tapovan corner on Mumbai-Agra highway. Also the ponds formed due to accumulation of rain water in front of Vajreshwari Nagar on Dindori Road.
Nashik News: गृहपालच आणायला लावतात मद्याच्या बाटल्या! इगतपुरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आदिवासी आयुक्तांकडे थेट तक्रार

गंगाघाटाजवळील परिसरही वर्षानुवर्षे जलमय होत आहे. यामुळे रस्त्याने पादच्याऱ्यांना व दुचाकीस्वारांना यातून वाट काढणे अवघड होत आहे. पावसाळ्यात दरवर्षी त्याच-त्याच परिसरात वर्षानुवर्षे तळे साचत असताना मात्र नाशिक महानगरपालिकेतील संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून नेमकी कुठली उपाय योजना केली जाते, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर दर पावसाळ्यात याकडे डोळेझाक केली जात असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पावसाळी कामांच्या घोषणा व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. मात्र वर्षानुवर्षे परिस्थिती जैसे थेच असल्याचा आरोप होत आहे. स्मार्ट सिटी विभागातून होणाऱ्या कामांबाबतही तीच परिस्थिती आहे. नाशिक शहर स्मार्ट सिटीचे ठिकठिकाणी फक्त फलक लावून प्रसिद्धी मिळवली जात असल्याचे बोलले जात असून प्रत्यक्ष कामात मात्र तो ‘स्मार्टनेस’ कुठेही दिसून येत नाही, अशी या स्मार्ट शहराची शोकांतिका असल्याचे पादचारी सांगतात.

Stagnant water at Tapovan corner on Mumbai-Agra highway. Also the ponds formed due to accumulation of rain water in front of Vajreshwari Nagar on Dindori Road.
Nashik News : वणी सापुतारा रस्त्यावर विजेचे तार पडल्याने विजेच्या धक्क्याने बैल ठार..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.