Nashik News : पंचवटीत जागोजागी पाण्याची डबकी

Nashik News : पावसामुळे पंचवटीत अनेक ठिकाणी रस्त्यावर, चौकात, सिग्नलवर रस्त्याच्या मध्यभागी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबके तयार होत आहे.
Ponds formed due to accumulation of rain water in area
Ponds formed due to accumulation of rain water in areaesakal
Updated on

Nashik News : पावसामुळे पंचवटीत अनेक ठिकाणी रस्त्यावर, चौकात, सिग्नलवर रस्त्याच्या मध्यभागी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबके तयार होत आहे. यामुळे दुचाकीचालकांसह पायी चालणाऱ्या नागरिकदेखील त्रस्त झाले आहेत . पंचवटी विभागात शनिवारी (ता. १३) सकाळपासून सायंकाळपर्यंत उघडीप सुरू होती. झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाण्याने डबके भरलेले दिसून येत आहे. (Water puddles in Panchavati due to rain)

मुख्य रस्ते, चौक, सिग्नल, रस्ता दुभाजक, फुटपाथवर पाणी निचरा होण्याची सुविधा नसल्याचा फटका पंचवटीकरांना बसत आहे. जुना आडगाव नाका, मखमलाबाद रोड, क्रांतीनगर, ड्रीम कॅसल चौक, मालेगाव स्टॅन्ड, दिंडोरी रोड, औरंगाबाद नाका, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, नाग चौक, गजानन चौक, सरदार चौक, पेठ नाका, रामवाडी, हनुमानवाडी, निमाणी, सेवाकुंज, अमृतधाम चौक, पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डसमोरील परिसर, मेहेरधाम, तारवालानगर, मेरी, म्हसरूळ, हिरावाडी रोड, कार्यसिद्धी चौक, नांदूर नाका, आडगाव, जत्रा हॉटेल चौक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी मार्गावर अनेक ठिकाणी, चौकाचौकात रस्त्याच्या मधोमध, रस्त्याच्या कडेला पाण्याचे डबके साचत आहे. (latest marathi news)

Ponds formed due to accumulation of rain water in area
Nashik News : नाशिक रोड, पंचवटीत मलवाहिकांचे जाळे; महासभेत 29 कोटींच्या कामांना मंजुरी

तसेच गंगाघाटा जवळील परिसरदेखील वर्षानुवर्षे जलमय होत आहे. यामुळे रस्त्याने पादच्याऱ्यांना व दुचाकीस्वारांना यातून वाट काढणे अवघड होत आहे. पावसाळ्यात दरवर्षी त्याच परिसरात वर्षानुवर्षं पाण्याचे डबके साचत आहेत. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून नेमकी कुठली उपाययोजना करतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

पादचारी, दुचाकीस्वार त्रस्त

पंचवटी विभागात जागोजागी पाण्याचे डबके साचत आहेत. यामुळे पादचारी व दुचाकीस्वार या रस्त्याने मार्गक्रमण करताना रस्त्यात साचलेल्या डबक्यातून एखादे चारचाकी वाहन वेगाने गेल्यास रस्त्यांवरील खराब पाण्याने भिजण्याचा व कपडे खराब होण्याचे प्रकार यामुळे वाढले आहेत. यामुळे दुचाकीस्वार व पादचारी यांना समोरून येणाऱ्या वाहनाबरोबरच शेजारील वाहनावरदेखील लक्ष ठेवावे लागत आहे. यावेळी अपघाताचा धोकादेखील वाढला आहे. पादचारी व दुचाकीचालक यामुळे त्रस्त झाले असून, याकडे बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून सदर समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे.

Ponds formed due to accumulation of rain water in area
Nashik News : मनमाड-कोपरगाव रस्ता चौपदरी करा; मंत्री भुजबळ यांची नितीन गडकरींकडे मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.