Nashik Tree Plantation : पर्यावरण रक्षणार्थ सरसावले जलसंपदा सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ!

Nashik News : सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांना कुणाशीही घेणे-देणे राहत नसल्याचे पहावयास मिळते. आपला घरप्रपंच भला नी आपण भले, यातच आनंद मानणारे आपण सभोवती पाहतो.
Members of Retired Engineers Association of Water Resources Department while planting various types of fruit trees and indigenous trees.
Members of Retired Engineers Association of Water Resources Department while planting various types of fruit trees and indigenous trees.esakal
Updated on

Nashik News : सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांना कुणाशीही घेणे-देणे राहत नसल्याचे पहावयास मिळते. आपला घरप्रपंच भला नी आपण भले, यातच आनंद मानणारे आपण सभोवती पाहतो. मात्र निवृत्तीनंतरही आपल्या विविधांगी कार्यातून जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त अभियंता मित्र मंडळाने सामाजिक कामाचा ठसा उमटवला आहे. (Tree Plantation)

सर्व सभासद एकत्र येऊन पर्यावरणाचा संदेश देऊन जनजागृती करीत आहेत. अनेक कारणांनी पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवणे व पर्यावरणाच्या रक्षणासाठी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ सरसावले आहे.

त्यांच्या पुढाकारातून दारणा धरण परिसरात जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त अभियंत्यांकडून नारायण उपनिषद म्हणून नव वृक्षांच्या रोपांची प्राणप्रतिष्ठा स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या एक वर्षापासून सर्व जलसंपदा निवृत्त अधिकारी एकत्र येऊन एकमेकांकडून लोकवर्गणीतून वृक्षलागवड, गरिबांना मदत असे स्तुत्य उपक्रम करीत आहेत. (latest marathi news)

Members of Retired Engineers Association of Water Resources Department while planting various types of fruit trees and indigenous trees.
Nashik News : मत्स्यबीज उत्पादनात नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर!

सेवानिवृत्त अभियंता सुहास पाटील, प्रमोद जावळे, अविनाश पाटील, गिरीश कंकरेज, देशमुख, शर्माजी, महाजन, पाथरकर, अहिरराव, थोरात, सुभाष मिसाळ, कापडणीस, भंगाळे, दारणा धरणावरील संदेशक संदीप मते यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते. याप्रसंगी निवृत्त अभियंत्यांनी त्यांचे अनुभव, कविता.

गाणी, भावगीत, भजन आदींनी मंत्रमुग्ध केले. जावळे, ढिकले आदी वयोवृद्ध अभियंत्यांनी जीवन किती सुंदर आहे याचा अनुभव करून दिला. हा उपक्रम दरवर्षी आयोजित करणार असून उपक्रमात भाग घेणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे आभार निवृत्त अभियंता सुहास पाटील यांनी मानले.

Members of Retired Engineers Association of Water Resources Department while planting various types of fruit trees and indigenous trees.
Nashik Civil Hospital : पंचनामा न होताच मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर! ‘सिव्हिल’चा भोंगळ कारभार पुन्हा उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.