Nashik Water Scarcity : जिल्हाधिकाऱ्यांकडून आज टंचाईचा आढावा; 170 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ जाणवत असून फेब्रुवारीतच ५५९ गावे आणि वाड्यांना १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcity esakal
Updated on

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ जाणवत असून फेब्रुवारीतच ५५९ गावे आणि वाड्यांना १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याविषयी जिल्हाधिकारी जलज शर्मा बुधवारी (ता.२१) दुपारी ३ वाजता टंचाई आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीसाठी गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. (Nashik Water Review of scarcity today by Collector marathi news)

नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने जायकवाडी धरणासाठी गंगापूर आणि दारणा समूहात जवळपास २७४० दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडावे लागले. यामुळे आता नाशिक जिल्ह्यावर पाणी टंचाई आणि प्रसंगी दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अल निनोचे वर्ष असल्याने पर्जन्यमान यंदाही विलंबाने होण्याची शक्यता गृहीत धरुन पाणी नियोजन करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील १५ पैकी ८ तालुक्यांत म्हणजे निम्म्या जिल्ह्यात गंभीर टंचाईची शक्यता आहे. आगामी काळात तालुक्यांचीही संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यात १७० टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. या गावांसाठी ३५८ टँकर फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcity : भर पावसाळ्यात पाणीबाणी...! ऑगस्ट उजाडला तरी 16 टँकर सुरू

तालुका : टँकर

बागलाण : १८

चांदवड : २२

देवळा : १४

मालेगाव : २३

नांदगाव : ४९

सिन्नर : ९

येवला : ३५ (latest marathi news)

Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcity: वापर वाढल्याने कृत्रिम पाणीटंचाई; सिडको, जुने नाशिक भागात मोटारीद्वारे उपसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()