Nashik Water Scarcity : जिल्ह्यातील 6 लाख लोकांची भिस्त टँकरवर; टंचाईच्या झळा तीव्र

Water Scarcity : जिल्ह्यात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्यांत आरोप-प्रत्यारोपांनी रान तापलेले असताना दुसरीकडे टंचाईच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत.
Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcity esakal
Updated on

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्यांत आरोप-प्रत्यारोपांनी रान तापलेले असताना दुसरीकडे टंचाईच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून जिल्ह्यातील धरणांमध्ये २० टक्के तर, गंगापूर धरणात ३३.४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अवकाळी पावसाने थैमान घातलेले असतानादेखील पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे. (6 lakh people in district depend on tanker water)

तब्बल ६ लाख लोकांची भिस्त ही टँकरच्या पाण्यावर आहे. गत आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे २६ टँकर वाढल्याने टँकरची संख्या ही ३५२ वर पोचली आहेत. सद्यःस्थितीत ३५२ टॅंकरच्या ७४५ फेऱ्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा चिंताजनक असून जायकवाडी धरण सात टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर लहान मोठ्या धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे.

एकीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे, अद्यापही मॉन्सून सुरू होण्यासाठी काही कालावधी असताना गत काही दिवसांपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील धरणात यंदा पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर आहे. गतवर्षी ३६ टक्क्यांवर असणारा जलसाठा आता २० टक्क्यांवर आला आहे. धरणांमधील पाणीसाठा घटत असताना टँकरची मागणी वाढत आहे.

काही गावांना वर्षापासून टँकरने पाणीपुरवठा

पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सद्यःस्थितीत ३२० गावे व ८२४ वाड्या अशा एकूण ११४४ गाव- वाड्यांना ३५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय तर, ३३८ खासगी टँकरचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार आजमितीस गंगापूर धरण समूहात ३३.४५ टक्के पाणी आहे. गतवर्षी हाच साठा ४९. ३१ टक्के होता. (latest marathi news)

Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcity : पाणी टंचाई उपाययोजनांबाबत दिंरगाई नको : मित्तल

कश्यपी धरणात २३.७० टक्के, गौतमी गोदावरी धरणात १६.२२ टक्के, पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात ९.०४ टक्के, करंजवन धरणात १४.८८ टक्के, वाघाड धरणात केवळ ३.९१ टक्के पाणी शिल्लक राहिला आहे. ओझरखेड धरणात शून्य टक्के, पुणे गाव धरणात शून्य टक्के तिसगाव धरणात ०.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

तालुकानिहाय सुरू असलेले टँकर

दुष्काळग्रस्त असलेल्या ५३ गावांना तसेच १३७ ठिकाणी टँकरसाठी १९६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तालुकानिहाय टँकरचा विचार करता बागलाण (४१), चांदवड (३१), देवळा (३३), इगतपुरी (७), मालेगाव (४६), नांदगाव (६९), नाशिक (१), पेठ (११), सुरगाणा (१६), सिन्नर (४०), त्र्यंबकेश्वर (१), येवला (५६) टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

पाणीसाठा चिंताजनक

दारणा धरणात २४.७६ टक्के, भावली धरणात ५.०९ टक्के, मुकणे धरणात २१.९२ टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात ९१.०५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गिरणा खोरे धरून समूहातील चणकापूर धरणात १३.६० टक्के हरणबारी धरणात ३०.६२टक्के , केळझर धरणात ८.३९ टक्के तर नागासाक्या धरणात शून्य टक्के तर गिरणा धरणात २१.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील धरणांत ३६.६७ टक्के पाणीसाठा होता. तर आजमितीला केवळ २०.२० टक्के असा चिंताजनक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcity : नियोजनशून्य कामामुळे पाणीटंचाईत भर! पाइपलाइन, व्हॉल फुटून हजारो लिटर पाणी वाया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.