Nashik Water Scarcity : नियोजनशून्य कामामुळे पाणीटंचाईत भर! पाइपलाइन, व्हॉल फुटून हजारो लिटर पाणी वाया

Water Crisis : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह अन्य धरणांची पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे
In Khadkali signal area, the water was lost and accumulated in the pit dug due to leakage of vol
In Khadkali signal area, the water was lost and accumulated in the pit dug due to leakage of vol esakal
Updated on

जुने नाशिक : स्मार्टसिटीच्या नियोजनशून्य कामांनी पाणीटंचाईत भर पडत आहे. विविध प्रकारच्या पाइपलाइन टाकण्यासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामाने बहुतांशी भागातील पाण्याची पाइपलाइन, व्हॉल फुटून गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वर्षभरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे चित्र खडकाळी सिग्नल परिसरात बघावयास मिळाले. (Nashik Water scarcity due to unplanned work news)

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह अन्य धरणांची पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे. यंदाच्या कडक उन्हाने पाण्याची मागणीही वाढली आहे. अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही. झाला तरी कमी दाबाने होत आहे. नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.

तर दुसरीकडे शहरात सर्वत्र स्मार्टसिटीचे कामे सुरू आहेत. नवीन पाइपलाइन टाकून काँक्रिटीकरण रस्ता तयार केला जात आहे. यासाठी ठिकठिकाणी खोदकामे करण्यात येत आहे. जेसीबीच्या साह्याने खोदकामे केली जात असताना पाण्याची पाइपलाइन आहे किंवा नाही याची खात्री केली जात नाही.

खोदकामादरम्यान जेसीबीच्या ड्रिलने पाण्याची पाइपलाइन आणि व्हॉल फुटण्याच्या घटना घडत आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. खडकाळी भागात रस्त्याचे काम करत असताना अशाच प्रकारे मुख्य पाइपलाइन फुटल्याने संपूर्ण परिसरास नदीचे स्वरूप आले होते. जीपीओ जलकुंभ आवारात नवीन व्हॉल बसविताना पाणी वाया जाण्याची घटना घडली होती. (Latest Marathi News)

In Khadkali signal area, the water was lost and accumulated in the pit dug due to leakage of vol
Nashik Water Scarcity : लासलगावकरांचा घसा कोरडाच; जलवाहिनी फुटल्याने 15 दिवसांपासून पाणीबाणी

तर काही दिवसांपूर्वी नवीन व्हॉललाच गळती लागून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहताना दिसले होते. त्यापूर्वी कालिदास समोरील जलकुंभाची मुख्य पाइपलाइन खोदकाम सुरू असताना फुटली होती. त्यातून परिसरात उंच फवारे उडून पाणी वाया तर गेलेच. शिवाय लाखो लिटर पाणी वाहत दहीपुलापर्यंत पोचले होते.

अशा अनेक घटना विविध भागात घडल्या आहेत. नियोजनपूर्वक कामे केली असती तर अशा घटना घडल्या नसत्या. त्यातून वाया गेलेले पाणी आजच्या परिस्थितीत नागरिकांना वापरण्यास मिळाले असते. अजूनही अशाच प्रकारे दुर्लक्षित कामे केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी खडकाळी सिग्नल परिसरातच जेसीबीने खोदकाम सुरू असताना व्हॉलला गळती लागून शेकडो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली.

खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून होते तर काही पाणी ड्रेनेजच्या पाईपलाईनमधून वाया गेल्याचे चित्र बघायला मिळाले. सध्याच्या परिस्थितीत घोटभर पाण्याचेदेखील महत्त्व वाढले आहे. अशा वेळेस कामे करत असताना नियोजनपूर्वक आणि पाणी वाया जाणार नाही. याची काळजी स्मार्ट सिटी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक करत आहे.

In Khadkali signal area, the water was lost and accumulated in the pit dug due to leakage of vol
Nashik Water Scarcity : देवनदी पात्र कोरडेठाक; सिन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.