Nashik Water Scarcity: दुष्काळाच्या ‘झळा’, पाणाडीभोवती होई गाव ‘गोळा’! मागील 3 महिन्यांत विहिरींच्या खोदकामात पाचपट वाढ

Water Crisis : मार्चअखेर दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवत असून, भूगर्भातील पाणीपातळी खोल जाऊन विहिरींनी तळ गाठला आहे
Panadi man
Panadi manesakal
Updated on

खेडलेझुंगे : मार्चअखेर दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवत असून, भूगर्भातील पाणीपातळी खोल जाऊन विहिरींनी तळ गाठला आहे. शेतकऱ्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच विहिरींचा गाळ काढणे, बोअरवेल करणे, विहीर खोदकाम करणे ही कामे सुरू केली होती. (Nashik Water Scarcity Five times increase in drilling of wells in last 3 months in khedle zunge marathi news)

निफाड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी मागील तीन महिन्यांत सरासरी दहापेक्षा अधिक नवीन विहिरी आणि बोअरवेल केले आहेत. विहीर कामाच्या सुरवातीला पाणी शोधणे अतिशय महत्त्वाचे असते. यामुळे पाणी शोधून देणाऱ्या पाणाड्यांना खूप मागणी आली आहे.

पाणी शोधून देणारा पाणाडी वापरत असलेल्या काही पारंपरिक पद्धती पूर्णतः अशास्त्रीय असतात किंवा त्यांना शास्त्राचा अंशतः आधार असतो. त्यांच्या सांगण्यावरून अनेकदा मुबलक पाणी लागते, तर कधी कधी पैशाचा अपव्ययही होतो.

शेतातील पाण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी वराहमिहीर यांनी केलेला शास्त्रीय अभ्यास आजही मार्गदर्शक ठरत आहेत. नारळ, विशिष्ट आकाराच्या तांब्याच्या तारा, ‘वाय’ स्वरूपाची निंबाची कोवळी काडी, पाण्याने भरलेला तांब्या यासारख्या साधनांची मदत घेतली जाते.

नारळाचे गतिमानतेचे प्रमाण, तारेची किंवा काड्यांची स्थिती बदलाचा वेग. त्यास लागलेला कालावधी या सूक्ष्म सूक्ष्म निरीक्षणावरून किती फुटावर किती पाणी असेल, याचेही विश्लेषण यातील जाणकार अचूक करतात. त्यांनी स्वअनुभवातून अनेक स्व सिद्धांत विकसित केले आहेत. त्या आधारे त्यांचे अंदाज बरोबरच असतात.  (latest marathi news)

पाणी शोधण्याच्या पारंपरिक पद्धती

नारळ पद्धती : तळहातावर सोललेला नारळ ठेवून आडवा ठेवून शेतात फेरी मारतात आणि नारळ जेथे सरळ होईल तिथे पाणी असणार हा अंदाज.

कडूलिंबाची काडी : वाय आकाराची कोवळी काडी घेऊन हातावर घेऊन फिरल्यास पाण्याच्या ठिकाणी सरळ होते.

तांब्याच्या तारा : एल आकाराच्या तांब्याच्या दोन तारांचे टोके दोन्ही हातात जमीन समांतर धरून फिरल्यास तारा पाणी असलेल्या ठिकाणी एकमेकींकडे आकर्षित होतात.

पाण्याने भरलेले भांडे : पाण्याने काठोकाठ भरलेले भांडे(छोटासा तांब्या) घेऊन फिरल्यास पाण्याच्या ठिकाणी त्यातील पाणी आपोआप सांडते.

धातूचा लोलक : खालच्या बाजूने टोकदार असलेला धातूचा लोलक व त्याला एक दीड फूट दोरा बांधून शेतात सावकाश फिरल्यास लोलक पाण्याच्या दिशेकडे आकर्षित होतो व पाण्याच्या ठिकाणी गोल गोल फिरतो.

विद्युत प्रतिरोधक सिद्धांत : पाण्याची खोली आणि स्थिती मापन करण्याची पद्धत शास्त्रीय पद्धत विद्युत वाहकातेच्या नियमानुसार कार्य करते.

कार्य पद्धती : धातूची तार अथवा इलेक्ट्रोड जमिनीत खोल खोचून वीजपुरवठा प्रवाहित करून नोंदी घेऊन, विश्लेषण करून भूजल मापन केले जाते. नोंदीमध्ये जमिनीतील अंतर्गत घटकांच्या प्रतिमा मिळतात. त्यावरून प्रतवारी करून निष्कर्ष काढण्यात येतात.  (latest marathi news)

Panadi man
Dhule Water Crisis : धुळे जिल्ह्यात 66 गावांना विहिरी अधिग्रहीत! जुन्या, गळक्या योजनांवरच पाणीपुरवठा अवलंबून

नैसर्गिक संकेत आणि जैविकदर्शक

निसर्गातील वृक्ष, त्यांची वाढ व वाढीची दिशा, जागेवर आढळणारे कीटक यासारख्या घटकांचा अभ्यास करून या पद्धतीत निष्कर्ष काढतात. वारूळ परिसरात खात्रीशीर पाणी असते, असे जाणकार सांगतात.

पाणीदर्शक वनस्पती : हरळी, लव्हाळ, जांभूळ, शमी, मंदार, बोर, पळस, उंबर, नारळ, कडूनिंब, सौंदड, वेत, बेहडा, निरगुडी, अर्जुन, कदंब, करंज यासारखे वृक्ष नैसर्गिकरीत्या वाढलेल्या ठिकाणी जमिनीखाली पाण्याचे अस्तित्व असते.

"पाणाड्याने दिलेल्या अंदाजानुसार पाणी लागेलच याची शाश्वती नाही. विहीर, बोअरवेलसाठी केलेला लाखोंचा खर्च वाया जाण्याची भीती असते. प्रशासकीय पातळीवरून यासाठी शास्त्रीय पद्धतींचे सार्वत्रिकीकरण होऊन शेतकऱ्यांना वाजवी दरात आणि सहजपणे जमिनीतील पाणी शोधण्याची सुविधा मिळायला हवी." - ऋषिकेश उगले, शेतकरी

Panadi man
Nashik Water Crisis : अनियमित पाणीपुरवठ्याने ओझरकर त्रस्त! पालखेड धरणात साठा कमी झाल्याचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.