Nashik Water Scarcity : चांदवड तालुक्यात पाणीटंचाईचा कहर जनावरांना मिळतेय एकच वेळ पाणी

Water Scarcity : तालुक्यात मे महिन्याच्या शेवटी पाणीटंचाईने कहर केला आहे. पाण्यावाचून नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत.
Women filling water from a tanker.
Women filling water from a tanker.esakal
Updated on

Nashik Water Scarcity : तालुक्यात मे महिन्याच्या शेवटी पाणीटंचाईने कहर केला आहे. पाण्यावाचून नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. जनावरांना दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे. माणसांसह जनावरांचा पाण्यावाचून जीव कासावीस झाला आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता आणखीन वाढली आहे. अनेक वस्त्यांना मागणी करुनही ट्रॅंकर सुरू झाले नाही. इतके दिवस पाणी विकत घेऊन शेतमळ्यातील नागरीकांनी आपली व जनावरांची तहान भागविली. ( In Chandwad taluka animals are getting water only once )

आता तर विकत देखील पाणी मिळेनासे झाले आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईत नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाद्वारे ३० गावे, ९२ वाड्या-वस्त्यांना १२ हजार लिटर क्षमतेच्या ८० टँकरद्वारे दररोज १० लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गाव व वाड्या-वस्त्यांवरील लोकसंख्येच्या तुलनेत टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा तुटपुंजा असल्याने नागरिकांचा घसा कोरडाच राहत आहे.

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तापमानात प्रचंड वाढ होऊन पाण्याचे स्रोत पूर्णतः आटले आहेत. यामुळे चांदवड तालुक्यातील प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईकाळात ओझरखेड धरणावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४४ गाव पाणीपुरवठा योजनेवर तालुक्यातील नागरिकांची तहान भागवण्याची सर्वस्वी जबाबदारी आहे.

मात्र, प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना तब्बल १५ ते २० दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावागावांत पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे. यासाठी प्रशासनाकडून ३० गावे व ९२ वाड्यांना १२ हजार लिटर क्षमतेच्या ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Women filling water from a tanker.
Nashik Water Scarcity : कोट्यवधींचा खर्च तरी मिळेना जल; पेठ तालुक्यातील आदिवासी बांधवांची रानोमाळ भटकंती

प्रत्येक गावांमधील लोकसंख्येच्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने नागरिकांची तहान भागत नाही. जीवन प्राधिकरणाच्या ४४ गाव योजनेच्या लासलगाव चौफुलीवर असलेल्या जलकुंभातून व चांदवड नगर परिषदेच्या जलकुंभातून कधीकधी पाण्याचे टँकर भरून तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो.

निफाड तालुक्यावरच भिस्त

ट्रॅंकरची संख्या वाढल्याने नागरिकांचा पाणीप्रश्‍न सुटावा, यासाठी निफाड तालुक्यातील कातरगाव, शिवले, सुंदरपूर, जळगाव येथे अधिग्रहित केलेल्या विहिरीतून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मे महिन्याच्या शेवटी वातावरणातील तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ होऊन नागरिकांचा जीव काहिलीने हैराण झाला आहे. या उष्णतेपासून संरक्षण मिळविण्यासाठी नागरिक पाणीपाणी करीत आहेत. या बिकट परिस्थितीत पाणी मिळत नसल्याने नागरिकांचा घसा कोरडाच आहे.

''आता सगळ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. पाऊस झाल्याशिवाय जनतेला दिलासा मिळणार नसल्याचे चित्र आहे. चांदवड तालुक्यातील २९ गावे अन् ९२ वाड्या-वस्त्यांना दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने पाणीपुरवठा करताना अडचण येत आहे. यासाठी निफाड तालुक्यातील दोन गावांमधून सध्या, तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, ४४ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.''- मंदार कुलकर्णी, तहसीलदार, चांदवड

Women filling water from a tanker.
Nashik Water Scarcity : वर्षभर 4 गावांना टॅंकर, इतरांचीही संख्या वाढतेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.