Nashik Water Scarcity : बहुमजली इमारतींमध्ये पाण्याचा तुटवडा; गंगापूर धरण पातळीत झपाट्याने घट

Nashik News : पाणीपुरवठा विभागाकडून अघोषित पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बहुमजली इमारतींना त्याचा पहिला फटका बसला आहे.
Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcityesakal
Updated on

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरात अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून अघोषित पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बहुमजली इमारतींना त्याचा पहिला फटका बसला आहे. (Water scarcity in multi storied buildings)

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सूचनेवरून मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाणी वाचले. परंतु दुसरीकडे पाणी कमतरतेमुळे महापालिकेच्या आरक्षणात कपात झाली. नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले.

शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होतो. सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल आहे. सध्या ६०३ मीटरपर्यंत पाणी पातळी आहे. ५९९ पर्यंत जलपातळी आल्यास नाशिककरांसमोर जलसंकट उभे राहणार आहे.

धरणात जेमतेम पाणीसाठा आहे. १५ जूनपर्यंत पाऊस लांबला तरी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या बाबी ध्यान्यात घेऊन शहरात अघोषित पाणीकपात लागू करण्यात आली आहे. अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरातील बहुतांश भागात कमी प्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे.

विशेष करून मोठ्या इमारतींमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शंभर ते पाचशे फ्लॅटच्या स्कीममध्ये पाणीटंचाईने कहर केला असून पाणी जपून वापरण्यासाठी वाहने धुऊ नका, कपडे, भांडी घासताना पाण्याचा कमी वापर करण्याच्या सूचना सोसायटी चेअरमनकडून दिल्या जात आहे. पाथर्डी, इंदिरानगर भागात विशेष करून टंचाई जाणवत आहे. (latest marathi news)

Nashik Water Scarcity
Nashik PM Narendra Modi : मोदींच्या सभेत कांदा शेतकर्याची मुस्कटदाबी! लासलगावात आंदोलन

शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफुटात)

- गंगापूर धरण- ३८०७

- दारणा व मुकणे धरण- १५०७

- एकूण आरक्षण- ५३१४

पाण्याचा वापर (दशलक्ष घनफूट)

- १५ ते ३१ ऑक्टोंबर- ३३४.६५

- एक ते ३० नोव्हेंबर- ५९३.६७

- एक ते ३१ डिसेंबर- ५९५

- एक ते ३१ जानेवारी- ६११.२७

- एक ते २९ फेब्रुवारी - ५७८.९८

- एक ते ३१ मार्च - ६०२.११

- एक एप्रिल ते ३० एप्रिल- ५९५.१४

- एक मे ते चौदा मे- २७२.१७

---------------------------------

एकूण वापर- ४१८२.९९

धरणातील पाण्याचा शिल्लक साठा (दलघफु)

धरण शिल्लक साठा टक्के

गंगापूर २५०४ २६.७८

दारणा १७५६ २४.५६

मुकणे १४८२ २०.४७

Nashik Water Scarcity
Nashik Eknath shinde Road Show : मुख्यमंत्र्यांचा गंगापूर रोडवर आज रोड शो! नाशिक शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.