बोलठाण : नांदगाव तालुक्यावर मागीलवर्षी वरुणराजा कोपल्याने तालुका व घाटमाथ्यावरील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पाझरतलाव कोरडेठाक पडले असून, जवळपास ७० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या आणि सर्वच ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. (Water Scarcity) शेतकऱ्यांना स्वत:बरोबरच पशुधनाच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. (Nashik Water Scarcity Nandgaon water shortage)
नांदगाव तालुक्यात मागीलवर्षी वरुणराजा कोपल्याने तालुक्यातील व घाटमाथ्यावरील ऊसतोड मजूर आणि कधीच ऊस तोडणीसाठी न गेलेले अनेक शेतकरी हाताला काम मिळावे व पशुधन वाचविण्यासाठी ऊस तोडणीच्या कामासाठी गेले होते. जवळपास ५० टक्के नागरीक उसतोडणीसाठी गेले होते.
ज्या भागात ऊस तोडणीसाठी गेले होते त्या भागातही काही ठिकाणी पाणीटंचाई, तर काही ठिकाणी पशुधनाच्या भविष्यात चाऱ्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने जनावरांसाठी ऊस साखर कारखान्यांना देण्यास नापसंती दर्शवली आहे. यंदा राज्यातील अनेक ठिकाणचे साखर कारखाने मागील आठवड्यापासून बंद झाले आहेत. (latest marathi news)
शेतात व गावात राहणाऱ्या नागरिकांना स्वतःसह पशुधनाच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ एक महिन्यापासून आली आहे. त्यातच उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेलेले नागरिक पुन्हा गावी परतत असल्याने ग्रामपंचायत मालकीच्या अगोदर असलेल्या आणि जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाणीपुरवठा योजना पुर्णतः कोलमडल्या आहेत.
घाटमाथ्यावरील कुसूमतेल, ढेकू खु॥, ढेकू बुद्रुक, ढेकू तांडा, जातेगाव, वसंतनगर एक व दोन, चंदणपूरी, लोढरे, बोलठाण, जवळकी, गोंडेगाव आणि रोहिले ह्या बारा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
"येत्या मार्चअखेर पर्यंत राज्यातील सुमारे ८० टक्के साखर कारखाने बंद होणार असून, १५ एप्रिलपर्यंत जवळपास सर्वच साखर कारखाने बंद होतील. परिणामी, उदरनिर्वाह करण्यासाठी गेलेले नागरिक आपापल्या गावी परतत आहेत."- बाबू चव्हाण, उसतोड मजूर ठेकेदार, ढेकून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.