Nashik Water Scarcity : टँकरची संख्या वाढत चाललीय...! जिल्ह्यात दिवसाला 15 लाख रुपये खर्च

water Crisis : जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे दिवाळी संपताच ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढत गेली आहे.
Water Tanker
Water Tankeresakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे दिवाळी संपताच ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढत गेली आहे. सद्यःस्थितीला ५९५ ठिकाणी १९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी प्रशासनाला दिवसाला तब्बल १५ लाख रुपये खर्च करावा लागत आहे. (Nashik number of tankers increasing in district marathi news)

टंचाईग्रस्त गावांसाठी कायमचे पर्याय शोधण्यात अपयश येत गेल्याने जिल्ह्यात टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यांच्यासाठी शासनाने टँकर क्षमतेच्या प्रमाणात दर निश्‍चित करून दिले आहेत. एक टनासाठी ३.४० रुपये दर निश्‍चित केला आहे. एक टँकर दिवसाला १५ ते ५० किलोमीटरपर्यंतची फेरी मारते. जिल्ह्यात १९१ टँकरद्वारे चारशेच्यावर टँकर फेऱ्या होतात.

त्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिवसाला १२ ते १५ लाख रुपये खर्च करावा लागत आहे. एकट्या येवला तालुक्यात दहा वर्षांत सुमारे सात कोटी रुपये निव्वळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी झाला आहे. अवर्षणप्रवण असलेल्या या तालुक्याचा साधा पाणीप्रश्न अजून सोडविता आलेला नाही.

टँकरसोबतच तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना, विशेष दुरुस्ती, विहीर खोल व गाळ काढणे, विंधन विहीर घेणे, खासगी विहीर अधिग्रहण असे मलमपट्टीचे अनेक पर्याय वर्षानुवर्षे प्रशासन राबवत आहे. मात्र, टँकरशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही टँकर बंद झालेले नाहीत.

असा होतो खर्च

एका टँकरला एक टन पाणी क्षमतेसाठी प्रतिकिलोमीटर तीन रुपये ४० पैसे दर शासनाने निश्‍चित केला आहे. दिवसाला २७० रुपये टँकरचे भाडे दिले जाते. प्रत्येक फेरी साधारणत: १५ ते ५० किलो मीटरपर्यंतची असते. शासकीय दरानुसार जिल्ह्यातील सुमारे ४०० फेऱ्यांसाठी १२ ते १५ लाख रुपये दिवसाला खर्च येतो. टँकरच्या फेऱ्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांना ‘जीपीएस’ प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. ऑनलाइन नोंदणीशिवाय त्यांना पैसे दिले जात नाहीत. (latest marathi news)

Water Tanker
Nashik Water Crisis : प्राणी, पक्षींची पाण्यासाठी वणवण! सप्तशृंगी गड, मार्केंडेय पर्वत परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटले

टँकर द्विशतकाच्या जवळ

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता आणि पाण्याची मागणी एकाचवेळी वाढू लागली आहे. टँकरची द्विशतकाकडे वाटचाल सुरू असून, मागणी वाढतच जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सात तालुक्यांमधील १८६ गावे आणि ४०९ वाड्या अशा एकूण ५९५ ठिकाणी १९१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सरकारी ११, तर खासगी १८० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या ४०९ फेऱ्या मंजूर असून, ४०३ फेऱ्या सध्या सुरू आहेत.

तालुकानिहाय टँकरद्वारे पाणी

तालुका....................गावे...............वाड्या...............टँकर

बागलाण.................२६......................०३....................२२

चांदवड.......................२४.....................४१...................२५

देवळा..........................१६....................३२...................२२

मालेगाव....................२४.....................४२.................२३

नांदगाव....................४७......................२२२..............४९

सिन्नर.......................०५.......................५४............१५

येवला.........................४४....................१५................३५

एकूण …..............१८६ ….............४०९................१९१ (latest marathi news)

Water Tanker
Nashik Water Crisis : नांदगावी जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणीपुरवठा! वाढत्या उन्हामुळे टंचाईग्रस्त गावांचा आकडा वाढतोय

धरणातील साठा (टक्के)

गंगापूर : ४९.९

कश्‍यपी : ५०.१६

गौतमी-गोदावरी : ४९.७३

आळंदी : ४१.४२

पालखेड : २६.३४

करंजवण : ४१.८०

वाघाड : २२.३७

ओझरखेड : ३३.१०

पुणेगाव : ८.६७

तीसगाव : ११.८७

दारणा : २५.३६

भावली : १३.११

मुकणे : ३३.१४

वालदेवी : ४३.७

कडवा : २६.७८

नांदूरमध्यमेश्‍वर : १००

भोजापूर : १०.५३

चणकापूर : ४०.८३

हरणबारी : ३९.२८

केळझर : १८.५३

नाग्या-साक्या : ००

गिरणा : ३१.९१

माणिकपुंज : १४.३

एकूण : ३४.८०

Water Tanker
Water Crisis: प्यायला पुरेसं पाणी नसताना लोक धुवत होते गाड्या; २२ नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.