Nashik Water Scarcity : ओझरखेडची पाणीपातळी खालावली; चांदवडकरांवर टांगती तलवार

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणात सध्या मृत साठाच शिल्लक राहिल्याने नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
Ozarkhed dam
Ozarkhed damesakal
Updated on

Nashik News : चांदवड शहरासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणात सध्या मृत साठाच शिल्लक राहिल्याने नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर आहे. काटकसरीने पाणी वापरल्यास सध्या धरणात जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा होईल इतकेच पाणी शिल्लक आहे. (Ozarkhed dam water level has decreased)

मॉन्सूनने वेळेवर अन् समाधानकारक हजेरी लावल्यास पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अन्यथा चांदवडकरांच्या घशाला कोरड निश्‍चित आहे. संभाव्य संकट टाळण्यासाठी आजपासूनच पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या चांदवड शहर, तालुक्याला ओझरखेड धरणातून पाणीपुरवठा होतो.

तत्कालीन आमदार दिवंगत जयचंद कासलीवाल यांनी ओझरखेड धरणातून चांदवडसाठी पाणी आणले. पुढे जाऊन ३३ गावांसाठी असलेली ही योजना आज ७० गावांसाठी कार्यान्वित आहे. १९९५ सालात ५० कोटी रुपये खर्च झालेल्या या योजनेनंतर चांदवड ग्रामीणसाठी पाणीदार काम करण्यात लोकप्रतिनिधींना अपेक्षित यश आले नाही. कायमच पाण्याभोवती फिरणाऱ्या इथल्या राजकारणाला पाण्याची कोरड कायम आहे.

मध्यंतरीच्या काळात चांदवड शहरासाठी माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सुमारे ७० कोटी रुपयांचा निधी खर्च करून ओझरखेडमधून पाणी आणत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले. नगर परिषदेच्या याच जलकुंभातून आज चांदवड ग्रामीणसाठी देखील टँकर सुरू असल्याने शहरासाठीची योजना ग्रामीणसाठी देखील उपयोगी ठरत आहे. (latest marathi news)

Ozarkhed dam
Nashik News : युनियन बँकेकडून ग्राहकांचे पैसे परत; 4 ग्राहकांना व्याजासह पैशांचा परतावा

ओझरखेड धरणात चांदवडसाठी १.०२४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. या पाण्याचा उपसा करण्यासाठी ३३५ एचपीच्या तीन पंपाद्वारे हे पाणी चांदवडपर्यंत आणले जाते. मात्र, पाणीपातळी खालावल्याने या पंपांचे पाईप उघडे पडले आहेत.

चारी खोदून देखील पाणीपातळी साधली जात नसल्याने थेट धरणात १५ एचपीचे तीन पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. ज्याचा थेट परिणाम सुमारे दोन लाख रुपयांच्या अतिरिक्त वीजबिल वाढीत दिसणार आहे. अतिरिक्त वीजबिल भरण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यामार्फत सध्या प्रयत्न सुरू आहेत.

वीजबचतीसाठी सौरउर्जा प्रकल्प

पाणीपुरवठा योजनेसाठी दरमहा सरासरी रु.११.०० लाख वीजबिल व रु.४.०० लाख देखभाल व दुरुस्तीसाठी खर्च येतो. म्हणजेच वार्षिक सर्वसाधारणपणे १.८० कोटी रुपये खर्च पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी येत आहे.

Ozarkhed dam
Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेत फूट! राजकारण तापले

सध्यस्थितीत सदर योजनेपासून मिळणारे उत्पन्न हे ३५.०० लाख इतके असून, नगर परिषदेला वार्षिक तोटा १.४५ कोटी रुपये सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून नगर परिषदेद्वारे ओझरखेड धरणावर ६०० किलो वॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्यात आहे.

सौरउर्जा प्रकल्पामुळे नगर परिषदेची वीज बिलावरील वार्षिक साधारणतः ७०.०० लाखापर्यंतची बचत होण्याची शक्यता आहे. शिवाय उर्वरित होणारा तोटा टाळण्यासाठी माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या प्रयत्नातून २ कोटी रुपयांचा निधी चांदवड नगर परिषदेकरीता मंजूर झालेला आहे. त्यामुळे सदर योजना कार्यान्वित राहण्यासाठी मदत झाली आहे. चांदवडकरांनी पाणी जपून वापरावे. - रमाकांत डाके, मुख्याधिकारी, चांदवड

Ozarkhed dam
Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.