Nashik Water Scarcity : हंडाभर पाण्यासाठी रात्रीचाही दिवस! चांदवड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

Water Scarcity : हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची नामुष्की तालुक्यातील नागरीकांवर आली आहे.
Even in the dark, there was a rush to fill drinking water.
Even in the dark, there was a rush to fill drinking water.esakal
Updated on

Nashik Water Scarcity : हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची नामुष्की तालुक्यातील नागरीकांवर आली आहे. टँकरच्या दोन फेऱ्या मंजूर असताना प्रत्यक्षात अनेक गावांत एकच फेरी येते. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढली आहे. तालुक्यातील २४ गावे व ४१ वाड्यांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना टँकरची मागणीही वाढली आहे. उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना चांदवड तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. (nashik water scarcity Severe water shortage in Chandwad taluka marathi news)

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना दुसरीकडे नागरिक पाणीटंचाईंने त्रस्त झाले आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. पूर्व भागातील निमोण, दरेगाव, वाद वराडी, कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव, शिंगवे, मेसनखेडे, कातरवाडी, वडगाव पंगू, रापली, कोकणखेडे आदी गावांना अत्यंत भयावह परिस्थिती आहे.

तीन-चार हजार लोकवस्तीच्या गावांना दहा- बारा हजार लिटरच्या टँकरने काहीच होत नाही. वाडी-वस्तीवरील लोकांना जनावरांसह स्वत:ला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक कुटुंबे विकत पाणी घेऊन आपली तहान भागवित आहे. एक हजार रुपयांना पाच हजार लिटरचा ट्रॅंकर घ्यावा लागत आहे. मोलमजुरी करणारे आदिवासी कुटुंबेही दोनशे लिटरच्या एका टाकीसाठी साठ रुपये मोजत आहेत. (latest marathi news)

Even in the dark, there was a rush to fill drinking water.
Nashik Water Scarcity : जिल्हाधिकाऱ्यांकडून आज टंचाईचा आढावा; 170 टँकरद्वारे पाणीपुरवठा

प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करीत नसल्यानेच लोकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. मार्च महिन्यातच अशी परिस्थिती असताना आगामी काळात अजून काय चित्र असेल, अशी भीती नागरीकांना आहे.

प्रतीव्यक्ती चार लिटर पाणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभातून दररोज तीस टँकर भरतात. तर नगरपरिषदेच्या जलकुंभातून दहा ते पंधरा टँकर भरतात. तरीही अनेक गावांना दररोज फक्त एकच खेप येते. तीन हजार लोकांना दररोज फक्त चार लिटर पाणी याप्रमाणे पाण्याचा पुरवठा सध्या होत आहे. चार लिटर दरडोई पाण्यात दिवस काढायचा कसा, इतके भयावह चित्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये आहे.

''तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. सध्या सुरू असलेल्या स्रोतांतून पाणीपुरवठा करताना अडचण येत आहे. म्हणूनच शेजारील तालुक्यातील पाण्याच्या स्रोतांचा शोध घेतला जातो आहे. येत्या काही दिवसात टँकरने पाणीपुरवठा सुरळीत होईल.''- मंदार कुलकर्णी, तहसीलदार, चांदवड

Even in the dark, there was a rush to fill drinking water.
Nashik Water Scarcity: नांदगावच्या घाटमाथ्यावर पाझरतलावात ठणठणाट! विहिरिंनी गाठला तळ, पाणीटंचाई तीव्र होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.