Nashik Water Shortage : रामेश्‍वरच्या किशोरसागर धरणात ठणठणाट; 32 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

Water Shortage : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली असून, पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.
Kishoresagar Dam at Rameshwar which is dry.
Kishoresagar Dam at Rameshwar which is dry.esakal
Updated on

Nashik Water Shortage : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली असून, पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तालुक्यातील पाच लघुपाटबंधारे कोरडेठाक झाल्याने त्यावर अवलंबून १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तालुक्यातील लघुपाटबंधारे चणकापूर व पुनदच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाचपैकी चार लघु बंधारे या दोन्हीही धरणाच्या आवर्तनावर अवलंबून असतात. ()

यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने पाणीसाठा फेब्रुवारीमध्येच संपुष्टात आल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. तालुक्यात २५ गावे, ३२ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्‍वर येथील किशोरसागर धरणात ११ मे रोजी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे. मात्र, इतर तीन लघु पाटबंधारे कोरडेच राहणार असून, मे महिन्यात पाण्याची भीषणता अधिक भेडसावणार आहे.

लघु पाटबंधारे व त्यावरील योजना

वार्षी पाझर तलाव : खर्डे, वार्षी, रामेश्‍वर, वाजगाव, वडाळा.

किशोरसागर : रामेश्‍वर, गुंजाळनगर.

करला पाझर तलाव : वाखारी, वाखारवाडी, गुंजाळनगर.

देवदरा नागीण तलाव : पिंपळगाव.

परसुल तलाव : कुंभार्डे, गिरणारे, सांगवी, तिसगाव, वराळे, उमराणे, चिंचवे, मेशी, खारीपाडा, दहिवड.(Latest Marathi News)

Kishoresagar Dam at Rameshwar which is dry.
Nashik Water Shortage : नांदगावला 20 दिवसाआड पाणीपुरवठा; गिरणावरील योजनेच्या जलवाहिन्या फुटतात वारंवार

चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर

पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना जनावरांना पाणी व चारा मिळवून देणे अवघड झाले आहे. पशुपालक शेतकरी कांद्याची पात, चारा वाहून जनावरांची भूक भागवत आहेत.

जनावरांची संख्या : ७७,२२३

गाय, बैल : ३२,९८४

म्हैस, रेडे : ४६१९

मेंढ्या, मेंढे : १०,५५८

शेळ्या, बोकड : २९,०७५

''देवळा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने दिलेल्या पीक पेऱ्यानुसार ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जनावरांना छावणी लावण्याची गरज नाही.''- डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, देवळा

Kishoresagar Dam at Rameshwar which is dry.
Nashik Water Shortage : इगतपुरीतील वाड्यापाड्यात भीषण पाणी टंचाई; नागरिकांची खोल उंट दरीत पायपीट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.