इंदिरानगर : यंदाच्या पावसाळ्यात धरणे ओव्हरफ्लो होत असताना आणि शहरासाठी मुबलक पाणीसाठा असतानादेखील वडाळागाव परिसरातील नागरिक मात्र एक महिन्यापासून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. वारंवार तक्रार करूनदेखील सुस्त प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
प्रभाग क्रमांक २३ मधील वडाळागावाजवळ असणाऱ्या खोडेनगर, शिवगिरीनगर, गोरे हॉस्पिटल आणि विठ्ठल मंदिर परिसर, विधातेनगर आदी भागात एक महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. (Water shortage in Wadala for month)