Nashik Water Crisis: गोशाळेसमोर जनावरांसाठी पाणीटंचाईची समस्या! 2 टँकरच्या माध्यमातून भागविली जातेय 400 जनावरांची तहान

Water Crisis : दानशुरांनी पाण्याच्या टँकरसाठी मदत करण्याचे आवाहन गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Goshala file photo
Goshala file photoesakal
Updated on

मालेगाव : शहर व परिसरात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. हरणबारी व चणकापूरचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे बहुतांशी पाणीपुरवठा योजनांना (Water Supply Scheme) दिलासा मिळाला आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्‍न दिवसागणिक गंभीर होत आहे.

येथील गोशाळा पांजरापोळ संस्थेच्या दाभाडी येथील गोशाळेत जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न तीव्र झाला आहे. चारशेपेक्षा अधिक जनावरांची तहान रोज दोन टँकरद्वारे भागविली जात आहे. दानशुरांनी पाण्याच्या टँकरसाठी मदत करण्याचे आवाहन गोशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (Nashik Water shortage problem malegaon marathi news)

येथील गोशाळा पांजरापोळ संस्था अनेक दिवसापासून कार्यरत आहे. संस्थेच्या येथील गोशाळेत ३७५ पेक्षा अधिक गोवंश जनावरे आहेत. संस्थेच्या कुकाणे व दाभाडी येथे उपशाखा आहेत. कुकाणे येथील गोशाळेत ४५० पेक्षा अधिक जनावरे आहेत. मालेगाव व कुकाणे येथील गोशाळांमध्ये विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे. किमान महिनाभर तरी जनावरांना पिण्याचे पाणी पुरेल. एप्रिल-मे मध्ये या ठिकाणीही पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दाभाडी येथील गोशाळेत गेल्या पंधरा दिवसापासून गोवंश जनावरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नऊशे रुपये प्रति टँकरप्रमाणे रोज दोन टँकर पाणी लागत आहे. गोशाळेत चारशेपेक्षा अधिक जनावरे आहेत. काही महिन्यांपुर्वी केलेल्या कुपनलिकेला पाणी लागले नाही.

पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसापुर्वीच पुन्हा कुपनलिका खोदली. मात्र या कुपनलिकेलादेखील पाणी लागले नाही. परिणामी संपुर्ण उन्हाळा तसेच जुलैच्या सुरवातीपर्यंत जनावरांना टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. जनावरांना टँकरने पाण्यासाठी अनेक दानशूर पुढे येऊ लागले आहेत.

अजून चार ते पाच महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहर व परिसरातील दानशुरांनी एक, दोन, पाच अशा स्वरुपात टँकरने पाण्याची मदत करावी असे आवाहन गोशाळेतर्फे करण्यात आले आहे. गोमाता व इतर जनावरांना संस्थेकडून कोरड्या चाऱ्याची कुट्टी मध्यप्रदेशमधून मागविण्यात आली आहे. बांडी, ऊस, कडबा आदी हिरवा चारा येथील बाजारात उपलब्ध होत आहे. एप्रिल- मे मध्ये हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍नही निर्माण होऊ शकेल.(Latest Marathi News)

Goshala file photo
Nashik Water Crisis: किकवारी परिसरात विहिरींनी गाठला तळ! पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

चारा छावण्या उभारण्याची मागणी

शासनाने मालेगाव तालुका दुष्काळी जाहीर केला आहे. कसमादेतील इतर भागदेखील टंचाईग्रस्त आहे. फेब्रुवारी महिना अर्ध्यावर संपला तरी जनावरांच्या चारा व पाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात.

या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे. ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक गावांमध्ये फेब्रुवारीमध्ये आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे.

"दाभाडी गोशाळेत दानशुरांच्या मदतीतून रोज दोन टँकरने गोमाता व इतर जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. गोशाळा परिसरातील विहीर आटल्याने टँकरने पाणीपुरवठ्याशिवाय पर्याय नाही. शहरासह कसमादे परिसरातील दानशुरांनी जनावरांच्या पाण्यासाठी मदत करावी."- संदीप भुसे, सचिव, श्री गोशाळा पांजरापोळ संस्था, मालेगा

Goshala file photo
Nashik Water Crisis: पिंपळगावकरांनो, पाणी जपून वापरा! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची पातळी खालावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.