Nashik Water Crisis : सलग तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळित; स्मार्ट सिटीच्या कामामुळे खोळंबा

Nashik News : बारा बंगला जर शुद्धीकरण केंद्रावर स्मार्ट सिटीचे काम खोळंबल्याने सलग तिसऱ्या दिवशी शहरात पाणीपुरवठा विस्कळित होता.
Nashik Water Crisis
Nashik Water Crisis esakal
Updated on

Nashik News : स्मार्ट सिटी कंपनीची मुदत जूनअखेर संपत असल्याने त्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. मात्र त्याचा फटका शहरवासीयांना बसत असून खोदून ठेवलेल्या रस्त्याने पाठोपाठ आता पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. बारा बंगला जर शुद्धीकरण केंद्रावर स्मार्ट सिटीचे काम खोळंबल्याने सलग तिसऱ्या दिवशी शहरात पाणीपुरवठा विस्कळित होता. (Water supply disrupted for third consecutive day)

विशेष करून जुने नाशिक व सिडको भागात पाणीपुरवठ्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे झाल्या. मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी आठ पूर्णांक सहा टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाणी वाचले.

परंतु दुसरीकडे पाणी कमतरतेमुळे महापालिकेच्या आरक्षणात जलसंपदा विभागाने कपात केली. नाशिकसाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले. शहराला दररोज वीस दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होतो. सद्यस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. मात्र रोजचा पाणी वापर लक्षात घेता जवळपास १९ दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल आहे. त्यामुळे महापालिकेने अप्रत्यक्ष अघोषित पाणी कपात सुरू केली आहे.

शनिवारी (ता.२५) जवळपास १५ हून अधिक पाइपलाइन व पाणीपुरवठा योजना दुरुस्तीची कामे पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी दिवसभर बंद ठेवला होता. पाणीपुरवठा विभागाने रविवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे जाहीर केले होते, प्रत्यक्षात मात्र रविवारीही पाणीपुरवठा बंद राहिला. त्यामुळे रविवारी संध्याकाळच्या सुमारास नाशिककरांना हंडे घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. (latest marathi news)

Nashik Water Crisis
Nashik ZP News : चुकीचे कामकाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; विविध विभागांतील 5 जणांचे निलंबन

स्मार्ट सिटी मुळे खो

शहरात स्मार्ट सिटीकडून रस्त्याची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी केबल टाकली जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. आता स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांचा विलंबाचा फटका पाणीपुरवठ्यावरही होत आहे.

स्मार्ट सिटी कंपनीकडून बारा बंगला पंपिंग स्टेशन येथे काम हाती घेण्यात आले. ते काम विलंबाने झाल्याने त्याचा परिणाम म्हणून सोमवारी जुने नाशिक व सिडको भागात पुरेसा पाणीपुरवठा झाला नाही. जुने नाशिक भागात बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक वैतागून गेले. अनेक भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

"बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथे स्मार्ट सिटीकडून काम सुरू आहे. कामास विलंब झाल्याने सोमवारी सिडको भागातील पवन नगर त्रिमूर्ती चौक तसेच जुने नाशिक भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला शहरात. मंगळवार (ता.२८) पासून नियमितपणे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल." -रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

Nashik Water Crisis
Nashik Dengue Update : जिल्ह्यात 99 रुग्णांना डेंगीची लागण; ग्रामीण भागातही प्रादुर्भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.