Nashik Water Supply News : मनेगावसह 22 गावांचा पाणीपुरवठा बंद! 6 लाखांचे वीजबिल थकले

Nashik News : भर पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने पाणीपुरवठा सुरु व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Rajaram Murkute, Datta Londhe and present officers and villagers while giving a statement to Panchayat Samiti Group Development Officers
Rajaram Murkute, Datta Londhe and present officers and villagers while giving a statement to Panchayat Samiti Group Development Officers esakal
Updated on

सिन्नर : मनेगाव सह २२ गावांना पाणीपुरवठा करणारे योजनेचे वीजबिल थकल्याने संबधित गावांचा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. ६ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने वीज पुरवठा बंद केला आहे. दरम्यान, भर पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने पाणीपुरवठा सुरु व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Nashik Water supply to 22 villages including Manegaon stopped)

पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेत योजना सुरू ठेवण्यासाठी साकडे घातले. खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देण्यात आले. योजनेतील अनुदान तातडीने मिळावे समाविष्ट गावातील ग्रामसेवकांची तातडीने बैठक घेऊन निधी जमा करण्याची कार्यवाही करावी. आठ दिवसात निधी जमा करावा. आदी मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना दिले.

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दत्ताजी लोंढे, राजाराम मुरकुटे, डॉ विष्णू अत्रे , धोंडवीर नगर पाटोळे व रामनगर चे सरपंच गोंदे गावचे रामदास जायभावे ,विश्वास शिंदे ,शिवाजी सोनवणे, नितीन भालेराव, गोविंद चांदोरे ,कैलास भाबड ,सुनील सांगळे, सौरभ कुरणे तेजस शिंदे आदीं उपस्थित होते. (latest marathi news)

Rajaram Murkute, Datta Londhe and present officers and villagers while giving a statement to Panchayat Samiti Group Development Officers
Water Supply : कऱ्हाड शहराला पालिकेकडून उद्यापासून पाणीपुरवठा; कोयना पुलावरुन पाईपलाइन नेण्यास मंजुरी

पिंपरी, कणकोरी योजना सुरू

बारागाव पिंपरी योजनेसह अनेक गावांचे पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र तेथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वीज बिल भरून पूर्ववत योजना सुरू केली. कणकोरी येथील पाचगाव योजनेचेही पाच दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यावेळी योजनेच्या समिती पदाधिकाऱ्यांनी ९ लाख बिल भरुन पाणीपुरवठा पूर्ववत करुन घेतला.

दरम्यान, मनेगाव योजनेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वर्षापासून पगार थकीत असल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. चार लाख रुपये समितीद्वारे देणे बाकी आहे . विज देयके पाणी योजना प्रोत्साहन अनुदान वितरित केले जाते. पंचायत समिती कडून प्राप्त झालेले प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून दर महिन्याला मंजूर केले जात होते. तथापि सहा महिन्यांपासून हे प्रस्ताव पडून असल्याने मनेगाव सह बावीस गाव पाणी योजनेचे पाच महिन्यापासून दहा लाख रुपये थकीत आहेत.

Rajaram Murkute, Datta Londhe and present officers and villagers while giving a statement to Panchayat Samiti Group Development Officers
Water Supply : सातारकरांसाठी खुशखबर! पाणीकपात मागे; पाणीसाठ्यांतील वाढीनंतर निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com