नाशिक : मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे यंदा उन्हाळ्यात नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची वेळ येणार नाही. समन्यायी पाणीवाटप नियमाच्या आधारे १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणात ६५ टक्क्यांपर्यंत भरले पाहिजे. या कालावधीत धरण शंभर टक्क्यांवर असल्यामुळे नाशिककरांचे पाणी वाचले आहे. पाण्यावरून मराठवाडा व नाशिक जिल्ह्याचा संघर्ष अद्याप मिटलेला नाही. (water will not go to Jayakwadi based on equitable water distribution rule )