Nashik News : पिंपळगाव बसवंत येथे सप्टेंबरपर्यंत नगर परिषद! याचिका निकाली

Nashik News : जिल्ह्यातील नामांकित ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Pimpalgaon Baswant Gram Panchayat
Pimpalgaon Baswant Gram Panchayatesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील नामांकित ग्रामपंचायतींमध्ये समाविष्ट पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिका १२ जून २०२४ ला निकाली निघाली असून, न्यायालयाने नगरविकास विभागाला ११ सप्टेंबर २०२४ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. (Pimpalgaon Baswant Gram Panchayat into Municipal Parishad)

त्याआधारे आता ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतराचा प्रस्ताव जिल्हा नगरविकास विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये पार पडली. त्यात विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या पॅनलचा एकच सदस्य निवडून आल्याने त्यांना पराभवाचा धक्का बसला.

विरोधी गटातील भास्कर बनकर यांचे तब्बल १२ सदस्य निवडून आल्याने एकहाती सत्ता त्यांना मिळाली. सत्ता स्थापन होऊन दीड वर्ष होत नाही, तोच आता उच्च न्यायालयाचा निकाल लागल्याने ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी नगरविकास विभागाला पत्रही दिले होते.

नगर परिषदेत रूपांतराचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपासून अडकला होता. नगर परिषदेचा दर्जा दिला जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते सतीश मोरे यांच्यातर्फे अ‍ॅड. रामचंद्र गिते यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने आता नगरविकास विभागाने तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ आपोआप संपुष्टात येणार आहे. (latest marathi news)

Pimpalgaon Baswant Gram Panchayat
Nashik News : पंतप्रधानांनी गुड गव्हर्नन्सची सुरवात ‘नाफेड’पासून करावी : बापूराव पिंगळे

ओझरप्रमाणेच प्रशासक...

ओझरप्रमाणेच पिंपळगाव बसवंतच्या ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होत असल्याने तिथेही प्रशासक राजवट लागू होईल. ओझर ग्रामपंचायतीची निवडणूक होताच लागलीच तिचे नगर परिषदेत रूपांतरचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांना फारच कमी दिवस काम करण्याची संधी मिळाली. तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी हा प्रस्ताव ठेवला होता; तर आता पिंपळगावचा प्रस्ताव विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी मांडला आहे.

आकडे बोलतात...

४१,५५९ : एकूण लोकसंख्या

५,४११ : अनुसूचित जाती लोकसंख्या

१०,४१० : अनुसूचित जमाती लोकसंख्या

२५,७३८ : इतर

१२,६५० : कृषक घटक

२,५३० : शेतकरी

१०,७२२ : मजूर

५,७०० : व्यापारी

४,२०० : शासकीय नोकर

१८,९८९ : अकृषक घटक

Pimpalgaon Baswant Gram Panchayat
Nashik District Bank : जिल्हा बॅंकेला शासनाकडून ‘आर्थिक टेकू’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.