Nashik Whether Update : तब्‍बल 109 दिवसांनंतर कमाल तापमान 30 अंशांच्‍या आत; गार वाऱ्यामुळे पाऱ्यात घसरण

Whether Update : यंदाच्‍या वर्षी अगदी मार्च महिन्‍यापासून उन्‍हाळ्याच्‍या झळा जाणवत असताना, बहुतांश वेळी पाऱ्याचा आलेख चढताच होता.
temperature
temperature esakal
Updated on

Nashik Whether Update : यंदाच्‍या वर्षी अगदी मार्च महिन्‍यापासून उन्‍हाळ्याच्‍या झळा जाणवत असताना, बहुतांश वेळी पाऱ्याचा आलेख चढताच होता. हंगामातील उच्चांकी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदविलेले असताना, सरासरी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहात होते. परंतु वातावरणात सध्या वाहत असलेल्‍या गार वाऱ्यामुळे पाऱ्यात घसरण झाली आहे व १०९ दिवसांनंतर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविले गेले आहे. ( 109 days maximum temperature within 30 degrees )

यापूर्वी गेल्‍या ३ मार्चला नाशिकचे कमाल तापमान २७.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. यानंतर मात्र सातत्‍याने कमाल तापमान ३० अंश सेल्‍सीयसपेक्षा अधिक राहात होते. कधी तप्त उन्‍हामुळे पारा वाढत असताना, गत महिन्‍यात झालेल्‍या बेमोसमी पावसामुळे घसरणदेखील नोंदविण्यात आली होती. तरीदेखील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच राहात होते. (latest marathi news)

temperature
Nashik Winter Update : नाशिकमध्ये 2 दिवस पुन्हा गारठा

यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. दरम्‍यान, जून महिन्‍यात समाधानकारकरित्‍या पाऊस बरसलेला नसला तरी पारा घसरण्यात वातावरणातील बदलांमुळे मदत झाली आहे. ढगाळ वातावरण राहात असल्‍याने दमट वातावरण निर्माण झाल्‍याने काही दिवसांपूर्वीपर्यंत उकाडा जाणवत होता.

परंतु सध्या वातावरणात गार वारे वाहत असून, वाऱ्याच्या गतीमुळेदेखील काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे. परिणामी पारा घसरण्यास सुरवात झालेली आहे. गुरुवारी (ता.२०) नाशिकचे किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. पारा घसरण्यासोबत कमाल व किमान तापमान यांच्‍यातील तफावतदेखील घटलेली आहे.

temperature
Nashik Winter Update : निफाड 5, तर नाशिकला 10.2 अंश सेल्सिअसची नोंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.