अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील महड येथील शेतीशिवारात सावजची शिकार करताना बिबट्या थेट कोरड्या विहिरीत पडल्याची घटना गुरूवार (ता.२०) घडली. संबधित शेतकरी शेतात काम करीत असतांना विहिरीत बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील आधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. (Nashik While hunting prey leopards directly into well)
शेतकरी सजन नथू खैरनार यांच्या शेतातील गट क्रमांक (१०५) मधील कोरड्या विहिरीत बिबट्या सावजाची शिकार करीत असताना विहिरीत पडला. श्री. खैरनार हे शेतातील कामानिमित्त गेले असता त्यांना विहिरीतून बिबट्याच्या डरकाळी फोडण्याचा आवाज कानावर पडला.
त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या दिसून आला. सजन खैरनार यांनी ताबडतोब ताहाराबाद वनपरिक्षेत्रात माहिती दिली असता वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणे, वनपाल सागर पाटील, ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनपाल तुषार देसाई, वनरक्षक रेणुका आहिरे, किसन आहिरे, दादाभाऊ सोनवणे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांचा ताफा सदर शेतकऱ्यांच्या शेतात दाखल झाला.
प्रथम वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी मोकळी केली व स्थानिकांच्या मदतीने लाकडी सीडी तयार करण्यात आली. लाकडी सीडी विहिरीत सोडली असता बिथरलेला बिबट्या सीडीवर चढलाच नाही. अखेरीस वनकर्मचा-यांनी विहिरीत पिंजरा सोडण्याचा निर्णय घेतला काही वेळातच बिबट्या अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला. (latest marathi news)
वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणेसह वनपाल सागर पाटील, तुषार देसाई व कर्मचाऱ्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश आले. बिबट्याला ताहाराबाद वनपरिक्षेत्रात हलविण्यात आले असून त्याला रात्रीतून त्याच्या आदिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने 'सकाळ'ला दिली आहे.
महड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी निश्वास सोडला. दरम्यान या परिसरात बिबट, तरस, मोर, रानडुक्कर, काळवीट आदि वनप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. वन्यजीवांना ताहाराबाद वनविभागाकडून जंगलात पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.