नाशिक : निसर्ग सौंदर्य...तंत्रज्ञानातून साधला जाणारा शहरांचा विकास..असे नयनरम्य दृष्य अनुभण्यापासून दृष्टीबाधित व्यक्ती वंचित राहात असतात. परंतु, काही दृष्टीबाधितांना शस्त्रक्रियेतून दृष्टी मिळवून देणे शक्य आहे. अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करताना २०२४ मध्ये सप्टेंबरअखेर ७५ जणांना दुनियेचा नजारा बघता येऊ लागला आहे. या कालावधीत दान स्वरूपात प्राप्त झालेल्या बुबुळांची संख्या १३१ आहे. (White Cane Safety Day 75 surgeries 131 irises donated in 9 months)
नेत्रदानासाठी विविध सामाजिक संस्थांकडून जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. मात्र अनेक वर्षांनंतरही या मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळतो आहे. विविध कारणांनी सध्या होणाऱ्या नेत्रदानाचे प्रमाण अल्प आहेत. असे असले तरी दरवर्षी किमान नेत्रदात्यांच्या संख्येत वाढ होते आहे. कोरोना महामारीच्या काळात मोहिमेला मोठी खीळ बसली होती. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून नेत्रदानाची चळवळ पुन्हा सक्रीय झालेली आहे.
नेत्रदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तींच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित संस्थांशी संपर्क साधणे अपेक्षित असते. परंतु बहुतांशवेळा संपर्क साधला जात नाही. त्यामुळे देखील नेत्रदानाचे प्रमाण कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अनेक दृष्टीबाधितांना शस्त्रक्रियेनंतर दृष्टी मिळू शकते. त्यामुळे त्यांनाही या सुंदर जगाची अनुभूती घेता यावी, यासाठी अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करण्याची आवश्यकता जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त व्यक्त केली जाते आहे. (latest marathi news)
आकडेवारी
वर्ष नेत्रदान झालेल्या शस्त्रक्रिया
२०२२-२३ १६६ १११
२०२३-२४ २०२ १२५
२०२४-२५ (सप्टेंबरपर्यंत) १३१ ७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.