Nashik News : पोलिस ठाणे आवारातून वाहनांची चोरी झाल्यास जबाबदारी कोणाची? ठाणे अंमलदाराचा प्रश्न

Nashik News : जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यातील वाहने सुरक्षित नसल्याचा साक्षात्कार येथील ठाणे अंमलदाराला झाला आहे.
Accidental vehicle outside the police station here.
Accidental vehicle outside the police station here.esakal
Updated on

Nashik News : जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यातील वाहने सुरक्षित नसल्याचा साक्षात्कार येथील ठाणे अंमलदाराला झाला आहे. त्यामुळे पिंपळगावकरांवर आपली वाहने सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आणखीनच वाढली असल्याचे असहाय पोलिसाच्या कबुलीवरुन दिसून येत आहे. सुरक्षा करणारे रक्षकच हतबल असतील तर रक्षणाची अपेक्षा कोणाकडून करावी, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. (Nashik News)

नाशिककला नोकरीनिमित्त दररोज जाणारे काही चाकरमाने येथील पोलिस ठाण्यात आपली दुचाकी वाहने पार्किंग करतात. रात्री-बेरात्री चाकरमाने पिंपळगावी येत असल्याने सुरक्षित जागा म्हणून पोलिस स्टेशनच्या आवाराचा पर्याय अनेक वर्षांपासून अनेकांनी निवडला आहे. शहरातून अनेकदा दुचाकी चोरीच्या घटना घडल्यानेच अनेकांनी हा पर्याय निवडला असला तरी काही पोलिस कर्मचाऱ्यांना आता ही बाब खटकू लागली आहे.

बुधवारी (ता. २६) रात्री ११:१० ते ११:१५ वाजता पिंपळगाव पोलिस ठाणे आवारातील दुचाकी घेण्यासाठी आलेल्या एका चाकरमान्याला कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदाराने आपल्या कक्षात बोलावत ‘आपण दररोज दुचाकी इथेच उभी करतात का?’ असा प्रश्‍न केला. त्यावर होकारार्थी मान डोलावल्यानंतर ‘त्या’ अंमलदाराने ‘उद्यापासून दुचाकी इथे पार्क करु नका’ असे फर्मान विनंतीपूर्वक सोडले.

एवढ्यावरच न थांबता ‘पिंपळगावमध्ये रोज ठिकठिकाणी दुचाकी चोरीचे प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात, पण चोर सापडत नाही’ अशी एकप्रकारे कबुलीच त्यांनी दिली. हे सांगत असतानाच समोर खुर्चीवर आसनस्थ महिला पोलिसानेही अपघातग्रस्त वाहनांचाही बंदोबस्त करायला हवा, अशी कल्पना मांडली. (latest marathi news)

Accidental vehicle outside the police station here.
Nashik News : तिरंगी लढतीने प्रत्‍येक मताला येणार ‘मोल’; नाईक शिक्षण संस्‍थेचे 27 ला मतदान

मात्र, अंमलदाराच्या बोलण्यावरुन बरेच प्रश्‍न पिंपळगावकरांच्या मनात पिंगा घालू पाहत आहेत. रवींद्र गुंजाळ या ठाणे अंमलदाराच्या जागरुकतेबद्दल त्यांना मनोमन सलाम ठोकावासा वाटत असला तरी पोलिस स्टेशनच्या आवारातच वाहने सुरक्षित राहत नसतील तर इतर ठिकाणचे काय, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

जुन्या वाहनांमुळे डासांचा प्रादुर्भाव

येथील पोलिस ठाण्याच्या आजूबाजूला अनेक वर्षांपासून जुनी वाहने धूळखात आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याच्या आवारातील जुन्या वाहनांचा प्रश्‍न निकाली लावण्याची योजना आखली होती. परंतु, त्यांच्या निवृत्तीनंतर ही योजना मागे पडली. पिंपळगाव पोलिस वसाहतीत अनेक कुटूंब राहत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Accidental vehicle outside the police station here.
Nashik News : काश्‍यपी धरणग्रस्त आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार! धरणातील पाणी आरक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com