नाशिक : हेल्मेट वापरणे कायदेशीर व संवैधानिक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हेल्मेट लोकांच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळेच ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी (ता. १५) देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी नाशिककरांनी हेल्मेट वापराचा संकल्प सोडल्यास नाशिक हे देशातील हेल्मेट (helmet) वापरणाऱ्यांचे रोलमॉडेल असणारे शहर ठरणार आहे. असे पोलिस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांनी सांगितले.
‘सकाळ संवाद’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता. १३) ‘सकाळ’ कार्यालयात भेटीप्रसंगी पांडे बोलत होते. नाशिक शहरात रविवारपासून लागू होणाऱ्या हेल्मेटसक्तीच्या उपक्रमाविषयी त्यांनी या वेळी माहिती दिली. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्वागत केले. आयुक्त पांडे म्हणाले, की हेल्मेटसक्ती हा लोकांच्या सुरक्षेसाठी घेतलेला निर्णय आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे नाशिक पोलिस स्वत:चे वेगळे काही करीत आहे, असा अर्थ अजिबात कुणीही घेण्याचे कारण नाही.
स्वातंत्र्यदिनी करा संकल्प
यापूर्वी कोलकता, बेंगळूरूसारख्या शहरांमध्ये हेल्मेट सक्तीचा निर्णय झाला. मात्र, या निर्णयाला तेथे अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची कारण वेगळी आहेत. नाशिक हे देशातील अनेक महत्त्वाच्या निर्णयाची, बदलाची सुरवात करणारे एक महत्त्वाचे शहर राहिले आहे. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यदिनी नागरिक वेगवेगळे संकल्प सोडतात. त्याच न्यायाने ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ या निर्णयाकडे पाहावे.
हेल्मेट नसल्याने अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. हा निर्णय राबविण्यापूर्वी लोकांना पुरेसा अवधी दिला आहे. फरक एवढाच आहे, की शासन निर्णय असला तरी यापूर्वी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नव्हती. स्वातंत्र्य दिनाचा संकल्प म्हणून या निर्णयाला महत्त्व देऊन नागरिकांनी निर्णय राबविल्यास नाशिक हे स्वतच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणाऱ्यांचे देशातील पहिले शहर ठरणार आहे. नाशिकला हा मान मिळावा म्हणून प्रत्येक नागरिकांचे यात योगदान असावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.