Nashik Winter : द्राक्षपंढरीला भरली हुडहुडी!; हंगामातील नीचांकी 8.5 अंशांवर तापमान

Fires lit by the fury of growing cold.
Fires lit by the fury of growing cold.esakal
Updated on

निफाड (जि. नाशिक) : वातावरणात दोन दिवसांपासून बदल होत थंडी वाढल्याने द्राक्षपंढरीला कापरं भरले असून, थंडीने या हंगामातील पहिला नीचांक शुक्रवारी (ता. १८) गाठला आहे. कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर ८.५ अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. गोदा, कादवा, विनता काठावर ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांबरोरच द्राक्ष मजुरांना थंडीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या द्राक्षपंढरीला हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. (Nashik Winter Temperature at season low of 8 half degrees Nashik news)

गेल्या काही वर्षांपासून थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. २०१८ मध्ये १.८ अंशावर तापमान पोचले होते. त्या वेळी कसबे सुकेणे येथे पुदिनावरती दवबिंदू गोठले होते. कारसूळ येथेही उसाच्या पाचटावरील दवबिंदू गोठले होते. दर वर्षी वाढती थंडी द्राक्षपंढरीसाठी निश्चितच हुडहुडी भरणारी ठरते. काही वर्षापासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील राज्यात बर्फवृष्टी होत असल्याने किमान तापमान उणे झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचे जोरदार आगमन होत असते.

यंदा वाढलेला पावसाने अजूनही जमिनीमध्ये ओलावा आहे, मात्र रब्बीसाठी ही थंडी पोषक ठरणार आहे. निफाड तालुक्यात सध्या मजूर मोठ्या प्रमाणावर आले आहेत, गाव तसे वस्तीवर राहणाऱ्या मजुरांना मात्र या थंडीचा फटका बसत आहे, त्यामुळे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीचा जोर असाच राहिल्यास द्राक्षाला फटका बसून द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Fires lit by the fury of growing cold.
Nashik : ‘बॉयफ्रेंड’ च्या वादातून विद्यार्थिनींची फ्रीस्‍टाईल; पोलिसांकडून समज

गेल्या काही वर्षांचे नीचांकी तपमान

२७ डिसेंबर १८ ः १.८

१७ जानेवारी २० ः २.४

६ फेब्रुवारी २१ ः ६

२९ जानेवारी २२ ः ४.४

१८ नोव्हेंबर २२ ः ८.५

"सध्या थंड हवामानाचा द्राक्षबागेवर फारसा परिणाम होणार नाही. उशिराने छाटणी सुरू झाल्याने द्राक्षमणी फुगवण होण्याची स्टेज असलेल्या बागा तुरळक प्रमाणात आहे. त्यावर ड्रिपद्वारे पाणी देऊन द्राक्षवेलीचे तपमान नियंत्रित ठेवता येते तपमान पाच सहा अंशाखाली आले, द्राक्षवेल सुप्तावस्थेत जाते. त्यांनतर वेलीचे अंतर्गत कार्य मंदावते, तेव्हा परिणाम होऊ शकतो."

-ॲड. रामनाथ शिंदे, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे विभाग नाशिक.

"ज्या द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्या गेल्या पंधरवाड्यात झाल्या आहेत, अशा छाटण्या झालेल्या द्राक्षबागांमधील फुटवा हा विलंबाने होईल. द्राक्षघड निघण्यास अडथळा निर्माण होईल. द्राक्षवेलीला विपुल प्रमाणात नत्र व खतपुरवठा झालेला आहे, अशा द्राक्षवेलींना थंड वातावरणाचा परिणाम जाणवणार नाही."

- छोटूकाका पानगव्हाणे, द्राक्ष उत्पादक, उगांव

Fires lit by the fury of growing cold.
Video Viral : नाशिकमध्ये चौघांना उडवणाऱ्या मद्यधुंद कारचालकाला पकडतानाचा थरार CCTVत कैद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.