Nashik Winter Update: किमान तापमानात 3 अंशांनी घट; कमाल तापमानात साडेतीन अंशांची वाढ

गेल्‍या काही दिवसांपासून पाऱ्यात सातत्‍याने चढ-उतार बघायला मिळतो आहे. हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्‍यानंतर पुन्‍हा पारा वाढला होता
Nashik recorded minimum temperature of 15.4 degrees Celsius news
Nashik recorded minimum temperature of 15.4 degrees Celsius newsesakal
Updated on

Nashik Winter Update : वातावरणातील बदलांचा अनोखा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. एका दिवसात किमान तापमानात तब्‍बल तीन अंश सेल्सिअसने घसरण झालेली असताना, दुसरीकडे कमाल तापमानात सुमारे साडेतीन अंश सेल्सिअसची वाढ नोंदविली आहे.

त्यामुळे सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असताना, दिवसाच्‍या वेळी मात्र सूर्यकिरणांमुळे सामान्‍य स्‍थिती राहिल्याने कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली. (Nashik Winter Update 3 degree decrease in minimum temperature 3 and half degree rise in maximum temperature)

गेल्‍या काही दिवसांपासून पाऱ्यात सातत्‍याने चढ-उतार बघायला मिळतो आहे. हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्‍यानंतर पुन्‍हा पारा वाढला होता. त्‍यातच गेल्‍या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे दिवसभर वातावरणात गारवा टिकून राहात होता. शुक्रवारी (ता. २२) नाशिकचे किमान तापमान १६.३ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २६.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

एका दिवसात पाऱ्यातील चढ-उताराच्‍या स्‍थितीमुळे शनिवारी (ता. २३) नाशिकचे किमान तापमान घसरून १३.२ अंश सेल्सिअस नोंदविले असून, कमाल तापमानात वाढ होऊन ३०.५ अंश सेल्सिअसची नोंद घेतली आहे.

Nashik recorded minimum temperature of 15.4 degrees Celsius news
Winter Care Tips : हिवाळ्यातल्या सर्दी खोकल्यापासून आराम देतो हा शिरा, रेसिपी सेव्ह करून ठेवा

दरम्‍यान, दिवसाच्‍या वेळी निरभ्र आकाश राहात असल्‍याने सूर्यकिरणांचा नाशिककरांना दिलासा मिळाल्‍याचे बघायला मिळाले.

राज्‍यात जळगाव सर्वांत थंड

सध्या राज्‍यभर थंडीचा जोर बघायला मिळत असून, आत्तापर्यंत मराठवाडा भागात सर्वाधिक गारठ्याची नोंद घेतली जात होती. परंतु शनिवारी (ता. २३) जळगावचे नोंदविलेले ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमान राज्‍यात नीचांकी राहिले. उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण आणखी वाढणार असल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Nashik recorded minimum temperature of 15.4 degrees Celsius news
Winter Skin Care : कोणतीही क्रिम नाही, घरी बनवलेलं शुद्ध तूप देईल Natural Soft Skin, हिवाळ्यात असा करा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.