Nashik Winter Update: नाशिकचे तापमान 12.5 अंशांवर; दुपारनंतर वाढ

पाऱ्यात पुन्‍हा एकदा घसरण होऊन किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
Cold has been increasing in city for three to four days dhule winter update news
Cold has been increasing in city for three to four days dhule winter update newsSakal
Updated on

Nashik Winter Update: नाशिकसह परिसरात सायंकाळनंतर गारठा वाढत आहे. दिवसाच्या सुरवातीला पारा काही अंशांनी वाढून दुपारी सामान्‍य स्‍थिती होत असल्‍याचा अनोखा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. (Nashik Winter Update temperature above 12 degrees news)

पाऱ्यात पुन्‍हा एकदा घसरण होऊन किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मात्र दिवसाच्‍या प्रखर सूर्यकिरणांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविली असून, सोमवारी (ता. २५) हे तापमान ३१.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

यंदाच्‍या हिवाळी हंगामात कधी गारठा तर कधी सामान्‍य वातावरण, अशी अनुभूती येते आहे. गेल्‍या १६ डिसेंबरला पारा घसरून यंदाच्‍या हंगामातील नीचांकी किमान तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

Cold has been increasing in city for three to four days dhule winter update news
Winter Skin Care : हिवाळ्यात अंघोळ केल्यानंतर त्वचेला खाज का येते? जाणून घ्या 'ही' कारणे

यानंतर मात्र पारा वाढत गेल्‍याने गेल्‍या दहा दिवसांपासून सरासरी किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्‍या जवळपास राहात होते. दुसरीकडे कमाल तापमानातही मोठी तफावत बघायला मिळत होती. सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असल्‍याने किमान तापमानात घट, तर दुपारी प्रखर सूर्यकिरणांमुळे कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली आहे.

जळगाव पुन्‍हा थंड

उत्तर महाराष्ट्रात सध्या कमालीचा गारठा जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी जळगावचे किमान तापमान राज्‍यात नीचांकी राहिले होते. सोमवारीदेखील जळगावचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, ते राज्‍यातील नीचांकी किमान तापमान ठरले आहे.

Cold has been increasing in city for three to four days dhule winter update news
Winter Skin Care : कोणतीही क्रिम नाही, घरी बनवलेलं शुद्ध तूप देईल Natural Soft Skin, हिवाळ्यात असा करा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.