Nashik Winter Update : तापमान घसरले, थंडी वाढली..! किमान 11.1 अंश तर कमाल तापमान 29.3 अंशांवर

दिवसा काही प्रमाणात ऊन लागत असले तरी सायंकाळनंतर गार वाऱ्यामुळे थंडीची अनुभूती नाशिककरांना येते आहे.
Winter Update
Winter Updateesakal
Updated on

नाशिक : वातावरणातून गायब झालेला गारवा आता पुन्‍हा परतला आहे. दिवसा काही प्रमाणात ऊन लागत असले तरी सायंकाळनंतर गार वाऱ्यामुळे थंडीची अनुभूती नाशिककरांना येते आहे.

गेल्‍या दोन दिवसांत किमान तापमानात साडे चार अंशांची घसरण झालेली असून सोमवारी (ता.१५) किमान तापमान ११.१ अंश सेल्सिअस तर कमाल २९.३ अंश सेल्सिअस राहिले. (Nashik Winter Update Temperature dropped cold increased)

यंदाच्‍या हंगामात नाशिकला अपेक्षेप्रमाणे थंडी जाणवलेली नाही. ऑक्टोबर अखेरपासून कधी थंडी तर कधी उकाड्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातून गारवा पूर्णपणे गायब झाला होता.

परंतु दोन दिवसांपासून पुन्‍हा थंडी जाणवू लागली आहे. शनिवारी (ता.१३) नाशिकचे किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.

तर कमाल तापमानदेखील ३० अंश सेल्सिअसहून अधिक झालेले होते. येत्‍या काही दिवसांत थंडीचा तडाखा आणखी वाढणार असून, यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्‍यातर्फे वर्तविला आहे.

Winter Update
Nashik Winter Update : निफाडचा पारा घसरला; 6.5 अंश सेल्सिअस

दिवसा उन्‍हाचा तडाखा

सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवत असला तरी दिवसाच्‍या वेळी मात्र प्रखर सूर्यकिरणांमुळे उन्‍हाचा तडाखा जाणवतो आहे.

विशेषतः दुपारी बारा ते दोन या वेळेदरम्‍यान तप्त सूर्यकिरणांमुळे कमाल तापमान अद्यापही वाढलेले आहे.

नाशिक तिसऱ्या स्‍थानी

राज्‍यात थंडीची लाट सध्या बघायला मिळत आहे. सोमवारी जळगावचे किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस राज्‍यात नीचांकी राहिले.

त्‍या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरचे किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस राहिले असून, किमान तापमानाच्‍या अनुषंगाने नाशिक तिसऱ्या स्‍थानी आहे.

Winter Update
Winter Skin Care : हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो? मग मिल्क पावडरचा असा करा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.