निफाड/ नाशिक : तालुक्यातील राजकीय वातावरण तप्त होत असले, तरी हवामानात मात्र बोचऱ्या थंडीची चाहूल लागली आहे. मंगळवारी (ता. १२) निफाडचा पारा १२ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात झाली. तसेच, नाशिकचे किमान तापमान १३.७ अंश सेल्सियस नोंदले गेले. निफाडसह तालुक्यात सध्या विधानसभेचे वातावरण गरम होत आहे, मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून थंडीची चाहूल लागली. (temperature in Niphad is 12 degrees Celsius )