सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनगीर येथे शनिवारी (ता. ६) सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान जोरदार झालेल्या पावसाने आलेल्या पुरात वाहून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहिल्याच पुरात अशी दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कमाबाई तुळशीराम भोये (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. (woman died in flood in Songir Incidents in Surgana Taluk)
याबाबत पोलिस पाटील तुळशीराम खिराडी यांनी दिलेल्या माहितीनुसार कमाबाई व तिचे पती तुळशीराम जीवन भोये हे सकाळी धुकट्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवीचा माळ येथील शेतात उडीद पेरणीकरीता गेले होते. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरु होता. कमाबाई या शेतातून गावातील दुकानात आल्या होत्या.
शेताकडे परतत असतांना त्या पुरात वाहून गेल्या. सोनगीर गावाशेजारी उंच धुकट्या डोंगर आहे. याच डोंगरावरून मान नदी उगम पावते. या उगमापासून आखडीची झरी व गोठणीची झरी या दोनही झऱ्यांचा प्रवाह असलेल्या ठिकाणी उतरत असतांना दगडावरून पाय घसरुन पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (latest marathi news)
माजी सरपंच सुरेश चौधरी, पोलिस पाटील तुळशीराम खिराडी यांनी पोलिस हवालदार दिलीप वाघ, तलाठी जयश्री वाडेकर यांना माहिती दिली. तलाठी यांनी तहसीलदार रामजी राठोड यांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सायंकाळी राहत्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, पती असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.