Nashik News : महिलेने रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म! स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने गरोदर मातांची उपेक्षा कायम

Nashik News : स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने पेठ येथील गरोदर माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्त्री रोगतज्ज्ञाचे पद रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे
A doctor shifting a baby born in an ambulance to the district hospital
A doctor shifting a baby born in an ambulance to the district hospitalesakal
Updated on

लखमापूर : स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने पेठ येथील गरोदर माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्त्री रोगतज्ज्ञाचे पद रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्याने पुन्हा एकदा गरोदर मातांची ग्रामीण भागात होणारी उपेक्षा समोर आली आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मातांना मुबलक आरोग्य सेवा कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Nashik woman gave birth baby in ambulance kalavan marathi news)

कळवण तालुक्यातील गोळाखाल येथील छकुली चेतन महाले ही माता प्रसुतीसाठी शनिवारी (ता. ७) सकाळी ११ च्या दरम्यान कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी त्या मातेने यापूर्वी केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली.

त्या अहवालात गर्भामध्ये असलेल्या बाळाचे ह्रदय हे विरुद्ध बाजूने असून, ह्रदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले. सदर बाळाला लागणाऱ्‍या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील १०२ रुग्णवाहिका सदर मातेला जिल्हा रुग्णालयात घेऊन निघाली.

परंतु, वणीजवळ या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्याने नातेवाईकांची तारांबळ उडाली. संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली. तेथील उपस्थित बाल रोगतज्ज्ञ डॉ. नेहा सिंगल यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करुन घेत माता व बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले.  (latest marathi news)

कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ हे पद आजही रिक्त आहे. स्त्री रोगतज्ज्ञ रुग्णालयात उपलब्ध असते तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रसुती होण्याची वेळ सदर मातेवर आली नसती, असा आरोप केला जात आहे.

"गरोदर मातेच्या सोनोग्राफीचा अहवाल तपासणीनंतर बाळाचे ह्रदय विरुद्ध बाजूने असून त्याला छिद्र असल्याचे निदर्शनास आले. प्रसुतीनंतर बाळाला तत्काळ व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने बाळाच्या सुरक्षितेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला. १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने १०२ रुग्णवाहिकेमध्ये मातेला पाठवण्यात आले होते."

- डॉ. कमलाकर जाधव, वैद्यकीय अधिकारी, कळवण

"सदर गरोदर मातेला १०२ रुग्णावाहिकेमध्ये जिल्हा रुग्णालयात घेवून जात असताना वणीजवळ महिला रुग्णवाहिकेमध्ये प्रसुती झाली. त्यानंतर त्या मातेला वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्या बाळाची तपासणी करण्यात आली. मातेला देखील प्राथमिक उपचार देण्यात आले. बाळाची अवस्था बिकट असल्याने पुढील आवश्यक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले."- डॉ. नेहा सिंगल, बाल रोगज्तज्ञ, वणी ग्रामीण

"प्रसुतीसाठी सकाळी ११ च्या दरम्यान आम्ही कळवण उपजिल्हा रुग्णालयात पोहचलो. डॉक्टरांनी नाशिकला हलवण्याचे सांगितले. रुग्णवाहिकेमध्ये येत असतांना रस्त्यातच प्रसुती झाली. जिल्हा रुग्णालयात पाठवण्याच्या आधी कळवण रुग्णालयात प्रसुती झाली असती त्यानंतर बाळ व मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला असता तर आमचे रस्त्यात हाल झाले नसते." - चेतन महाले, पीडीत मातेचा पती

A doctor shifting a baby born in an ambulance to the district hospital
पत्नी बनवायची इन्स्टा रील्स, अश्लील कमेंट्स पाहून वैतागलेल्या पतीने संपवलं जीवन; live करत म्हणाला, तुमच्या घरी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.