Women's Day 2024: पतीने वाऱ्यावर सोडूनही जिद्दीने बदलल्या भाग्याच्या रेषा! आखतवाडेच्या डाळिंब निर्यातदार 'ती'ची कहाणी

Nashik News : बागलाण तालुक्यातील रोहिणी ह्याळीज या जिद्दी महिलेने डाळिंबाची शेती करीत थेट निर्यात करण्यापर्यंत मजल मारली आहे.
Rohini Hyalij & pomegranate crop
Rohini Hyalij & pomegranate cropesakal
Updated on

सटाणा : एकामागून एक संकटे आली, की माणसे कोलमडून पडतात. ज्याच्यासमवेत आजन्म सोबत राहण्याचे सातफेरे घेतले, त्यानेही अर्ध्या वाटेवर वाऱ्यावर सोडले तर जगण्याच्या आशाच संपुष्टात येतात. अशा दोलायमान परिस्थितीत काही महिला जिद्दीने उभ्या राहत सारेच अनुमान खोडून काढतात व परिश्रमाच्या बळावर भाग्याच्या रेषाच बदलून टाकतात.

तेव्हा त्या अन्य दु:खी महिलांसाठी आदर्श वाटल्यावाचून राहत नाहीत. बागलाण तालुक्यातील रोहिणी ह्याळीज या जिद्दी महिलेने डाळिंबाची शेती करीत थेट निर्यात करण्यापर्यंत मजल मारली आहे. (Nashik international Women Day 2024 Akhatwade pomegranate exporter rohini hyalij marathi News)

बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील श्रीमती रोहिणी दशरथ ह्याळीज (वय ४५)यांचा खडतर प्रवास अनेक निराधार झालेल्या महिलांना उभारी देणारा आहे. रोहिणीचे प्राथमिक शिक्षण सटाणा व मनमाडला, माध्यमिक शिक्षण अभोणा येथे झाले. बारावीत असताना लग्न झाले.

पदवीधर पती मिळाला. त्यांचे खासगी कोचिंग क्लासेसला भरपूर प्रतिसाद मिळायचा. मात्र मुलगा झाल्यानंतर क्लासेस बंद पडल्याने पती व्यसनाधीन झाला.वडिलांनी बंद पडलेले शिक्षण पुढे चालू केले.माहेरच्यांनी शिक्षणास प्रवृत्त केल्यामुळेच नामपूर महाविद्यालयात बी.ए.ची पदवी मिळवली.

मात्र सासरची पूर्ण साथ सुटली. एक मूलगा झाल्यावर पुढे काय करायचे या यक्ष प्रश्नाने सतावले. पदवीधर असल्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज, विनंत्या केल्या. पोलीस भरती, स्टाफ सीलेक्शन, नर्स अशा नानाविध जागांसाठी प्रयत्न सुरू ठेवले.२०१० मध्ये तात्पुरती नोकरी मिळाली.त्या आनंदात असतानाच भावाचे अकाली निधन झाले.

आता सर्वच दारे बंद झाली तरी खचून न जाता पुन्हा उभारी धरली व सटाणा महाविद्यालयातून एम. ए. ची पदवी घेतली. सासरचा कोणताही आधार नाही. माहेरी वडिलोपार्जित जमीन कसण्याची इच्छा रोहिणी यांनी आईकडे व्यक्त केली. माहेरी राहून वडिलांच्या मालकीच्या तीन एकर शेतीत मका, कांदे ही पारंपरिक पिके सुरुवातीस घेतली. (Latest Marathi News)

Rohini Hyalij & pomegranate crop
International Women's Day : महिलेच्या हाती व्यवसायाची दोरी; आगरी लस्सीचा ब्रँड केला विकसित

२०१३ मध्ये वडिलांचे आजारपणात निधन झाले. अशावेळी आईने जिजाऊसारखी उभारी दिली. पारंपारिक शेतीला फाटा देऊन अडीच एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. सुरुवातीस मामा साहेबराव सूर्यवंशी यांनी रोपे दिली. लागवड ठिबक सिंचन व्यवस्था उभी मात्र दुष्काळाच्या दाहकतेमुळे विहिरींचे पाणी आटले, हातातोंडाशी आलेले डाळिंबाचे पहिले पीक जाईल या भीतीने ग्रासले.

पुन्हा दोन ठिकाणी उभे बोअर केले. दिवसातून अनेकदा बोअर चालू बंद करून मिळेल तेवढे पाणी विहिरीत साठवून डाळिंब बाग जगवली. आंतरमशागतीचे सर्व कामे,छाटणी. खत लावणे ही कामे, फवारणी, पेस्टिंग स्वतः केले.२०१९ मध्ये कोरोनाच्या महामारीत तात्पुरती नोकरी सांभाळून डाळिंब शेती केली.

पुरेसे पाणी नाही तरीही अत्यल्प पाण्यावर २०१९ मध्ये दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन काढले. तीन टन डाळिंब ७९ रुपये प्रति किलो दराने, १९२० मध्ये ८५ ते ९७ रूपये प्रति किलो जागेवरच भाव मिळाला. स्व. वडिलांचे व भावाचे स्वप्न पूर्ण केले. मध्ये दर्जेदार डाळिंब उत्पादन घेतले. काठमांडू, बेंगलोर, कोलकात्ता व एक्सपोर्ट साठीही माझे उत्पादन पात्र ठरले.

२०२०-२१ मध्ये १३१ रूपये, तर२०२३ मध्ये १३० रुपये किलो दराने चार टन डाळिंब पाठविले. डाळिंबशेतीसाठी प्रगतीशील शेतकरी मिलिंद भामरे व गौरव खैरनार यांनी मार्गदर्शन केले. आजूबाजूला तेल्यासारखा रोग असल्यावरही योग्य मार्गदर्शन मिळाल्याने कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेऊन रोहिणी ह्याळीज यांनी महिलांसमोर आदर्श उभा केला आहे.

Rohini Hyalij & pomegranate crop
International Women's Day 2024 : अन्नप्रक्रिया उद्योजिका घडविणारी ‘मसाला क्वीन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.