Women's Day Special: अत्यंत कष्टमय व चिकाटी असलेले काम पहाटे उठून महिला पेपर विक्रेत्या! मोडल्या चौकटी, झाले आसमंत खुले

Women's Day Special : दैनंदिन जीवनामध्ये वृत्तपत्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. वृत्तपत्राच्या वाचनाशिवाय दिवस सुरू होत नाही.
Both sisters Sakshi and Suhani Bhosle distributing newspaper.
Both sisters Sakshi and Suhani Bhosle distributing newspaper.esakal
Updated on

Women's Day Special : दैनंदिन जीवनामध्ये वृत्तपत्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. वृत्तपत्राच्या वाचनाशिवाय दिवस सुरू होत नाही. अनेक वर्षापासून या क्षेत्रात पुरुषच काम करताना निर्दशनास येते. मात्र या क्षेत्रात काही वर्षांपासून महिलांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. घरातील कर्त्या पुरुषाला व्यवसायात मदत म्हणून घरची कामे सांभाळून अत्यंत कष्टमय व चिकाटी असलेले काम पहाटे उठून महिला पेपर विक्रेत्या महिला करत आहेत.- निखिल रोकडे

ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता अविरत वर्तमानपत्रांचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोणी सायकलवरुन, तर कोणी चालत घरोघरी वर्तमानपत्र पोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या आता व्यवसायामध्ये महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते. छोट्या, छोट्या कामातूनच माणसाची मोठी ओळख निर्माण होते.

वृत्तपत्र विक्री व्यवसायात नवीन व्यक्ती येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रे घरोघरी पोचविणे हे अत्यंत मेहनतीचे व कष्टमय काम होय. तेही वेळेत झाले पाहिजे. म्हणूनच यावर पर्याय म्हणून वृत्तपत्र विक्रेते कुटुंबातील महिलांनीच पुढाकार घेतला आहे.

आपल्या घरातील कर्त्या पुरुषांना या व्यवसायात नुसती मदतच नव्हे तर बरोबरीने सहभागी सुद्धा होत आहेत. पहाटे साडेतीन वाजता उठणे, पेपर घेण्यास जाणे, त्यानंतर वृत्तपत्राचे घरोघरी वाटप करणे, स्टॉलवर बसणे, याचबरोबर घरातील दैनंदिन कामांची जबाबदारी महिला लिलया पार पाडत आहे. विशेष करून यामध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे.(latest marathi news)

Both sisters Sakshi and Suhani Bhosle distributing newspaper.
Women's Day Special : गिफ्ट द्यायचंय? आई, बहीण, बायको आणि मुलीसाठी हे आहेत 'गिफ्ट ऑप्शन'!

नाशिकमधील महिला पेपर विक्रेत्या

ज्योती जगताप, रश्मी प्रताप यादव, रेखा प्रकाश जगदाळे, मनीषा निवृत्ती धात्रक, कमलाबाई भदाने, कमल नितीन पाटील, सविता भास्कर निंबाळक, मंदाकिनी मंगेश पवार, खुशाली चंद्रकांत पवार, अरुणा जयवंत माळी, वैशाली गिरीश कुलकर्णी, रोहिणी योगेश नांदुर्डीकर, मंगला मोरडे, नीलिमा विनोद पाटील,

सुरेखा देविदास बाविस्कर, हेमलता संदीप जोशी, मंदा रमेश शिरोळे, साधना अनिल निंबाळकर, ज्योती संजय झावरे, स्वाती दळवी, मनिषा नेर, सुनीता जाधव, गायत्री कुंभार्डे, सुषमा मडके, सुवर्णा सूर्यवंशी, शिवेंका ठाकरे, विजया वाळेकर, दर्शना ठाकूर, सोनाली देसाई, राजश्री कापुरे, सुवर्णा रवींद्र खैरनार, रूपाली त्र्यंबके, मनीषा शिंदे, पल्लवी कर्पे, मंदाकिनी रहाटळ.

वर्षा देऊळगावकर, स्मिता कैलास बच्छाव, शोभाबाई सळंत्रे, शकुंतला चौधरी, गौरी महाजन, वर्षा पाथ्रीकर, पुष्पा भांड, मंदा रतन एरंडे, शशिकांता दिलीप कटारिया, राजश्री नानासाहेब पावशे, अनिता शरद पावशे, प्रतिभा महेश कुलथे, सुनीता किरण ठोसर, संपदा फडके, साक्षी भोसले, सुहानी भोसले, अश्विनी शशिकांत बोरसे, संगीता उत्तम गांगोडे.

Both sisters Sakshi and Suhani Bhosle distributing newspaper.
Womens Day Special : वयाच्या 22 व्या वर्षी गर्भाशय काढले जाते आणि ती बनते परमनंट ऊसतोड मजूर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.