Women's Day Special : मुक्या प्राण्यांवर जीव ओवाळून टाकणारी खाकीतील ‘मीरा’!

Women's Day Special : पोलिसांची सार्वजनिक प्रतिमा समाजात ‘ते भ्रष्ट असतात, कामचुकार असतात, हडेलहप्पी असतात’ अशी असते.
Meera Adamane with pat dog
Meera Adamane with pat dogesakal
Updated on

Women's Day Special : पोलिसांची सार्वजनिक प्रतिमा समाजात ‘ते भ्रष्ट असतात, कामचुकार असतात, हडेलहप्पी असतात’ अशी असते. ते दुबळ्यांच्या आणि पीडितांच्या बाजूने उभे राहतील, अशी खात्रीही लोकांना वाटत नाही. एकूणच, लोकांना त्यांच्याबद्दल खात्री, विश्‍वास आणि आपुलकी वाटत नाही. मात्र, काहीजण यास अपवादही असतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीरा आदमाने यांचे प्राणिप्रेम निश्‍चितच दखलपात्र आहे. (nashik Women Day Special Mira in khakee marathi news)

भटक्या जखमी कुत्र्यांवर औषधोपचार करून त्यांना ठणठणीत बरं करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. ज्यांच्या संरक्षणार्थ आपण तैनात आहोत, त्यांनाच आपल्याबद्दल संशय आहे, ही भावना पोलिसांचे नीतिधैर्य खालावणारे असणार! त्यामुळे लोकांचे पोलिसांबद्दलचे हे मत एका बाजूला ठेवून पोलिस स्वतःकडे कसे पाहतात, स्वत:च्या कामाकडे कसे बघतात, त्यांची नोकरी-संसार, कामाच्या वेळा, पगार-पाणी, सांसारिक अडचणी, आजारपण, मानसिक ताण वगैरेंकडे बघण्याची दृष्टी कशी आहे, हे समजून देण्याचा प्रयत्नच मीरा आदमाने यांनी केला आहे.

मूळच्या हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजारच्या रहिवाशी असलेल्या आदमाने यांनी २०१० यांनी सरळ सेवा भरतीतून तलाठी म्हणून सेवेला सुरुवात केली. २०११ ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदावर नाशिक ग्रामीण पोलिस दलात सेवा सुरु केली.(latest marathi news)

Meera Adamane with pat dog
Women's Day Special: अत्यंत कष्टमय व चिकाटी असलेले काम पहाटे उठून महिला पेपर विक्रेत्या! मोडल्या चौकटी, झाले आसमंत खुले

‘उजव्या हाताचा पूर्ण उघडलेला पंजा, मांसल आणि बळकट! या पंजाला घेरणारं एक वर्तुळ. या वर्तुळाला कवेत घेणारा ठसठशीत तारा. या ताऱ्याच्या पायाशी दिमाखाने झळकणारे दोन शब्द ‘सद् रक्षणाय- खलनिग्रहणाय’! याच ब्रीदवाक्याला साजेसे काम करताना मनस्वी आनंद होतो, असे त्या अभिमानाने सांगतात.

कुत्री, मांजरांचे नामकरण!

जखमी कुत्री व मांजरांवर उपचार केल्यानंतर त्यांना कोणत्या नावाने हाक मारायची, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आदमाने यांच्याकडे सध्या कृष्णा, चॉकी, सोनी, चिकी, सोनुली, राणी, भुरी, मोनी नाव असलेली कुत्री आहेत. तर पँथर, शिबी, गुड्डू ही मांजरे आहेत.

''मुक्या प्राण्यांना जीव लावला तर जन्मभर ते विसरत नाहीत. कायद्यात काम करताना चांगले-वाईट अनुभव येतातच; पण, आपला हेतू प्रामाणिक व सरळ असेल तर तुमच्या ध्येयापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.''- मीरा आदमाने, पोलिस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Meera Adamane with pat dog
Women's Day Special : कॉलराने कसा घेतला होता मुलींच्या पहिल्या शाळेचा बळी ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.