Nashik Women Inspirational Story : माहेरी गरिबी नशिबाला पूजलेलीच... त्यामुळे पहिलीतच शाळा सुटली. आईबरोबर वयाच्या सातव्या वर्षापासून धुणीभांडी करीत कष्टाचे धडे घेतले. खेळण्या-बागडण्याच्या वयात शिक्षणाकडे पाठ फिरवावी लागली. नियतीने कठीण परीक्षा घेतली, तरी त्यात आपणच बाजी मारणार... या आत्मविश्वासावर ती लढत राहिली. कुटुंबासाठी आधार होतानाच उत्तर महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायातून स्वतःची ओळख उभ्या केलेल्या नाशिकजवळच्या आडगाव येथील कमलबाई मोरे महिलांसाठी प्रेरणादायी ठरल्या. (Women Inspirational Story First pass Kamlabai become professional )