अतिशय कष्टमय जीवन जगत असताना रोजचा संघर्ष जणू तिच्या माहेरी पूजलेलाच होता... आई-वडिलांच्या रोजच्या संघर्षाची ती जणू साक्षीदारच बनली होती. आईसोबत धुणी-भांडी करण्याचे काम करताना सातवीतच शाळा सुटली. खेळण्या-बागडण्याच्या वयातच कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी तिच्या नशिबी आली... परिस्थिती गरिबीची असली तरी माहेरच्या संस्कारांतून वाढलेल्या वाटचालीला कष्टाची जोड देत चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबाला हातभार लावत संसाराची गाडी समृद्ध केली, ती नैताळे (ता. निफाड) येथील सुनीताताई देसाई यांनी...
( Women Inspirational Story of Sunitatai supports her family through her laundry business )