Nashik Women Inspirational Story : आयुष्यात कधी-कधी असा प्रसंग येतो की सारे आयुष्यच पालापाचोळ्यासारखे विस्कळित होते. चहूबाजूंनी संकटांचा फेरा, बिकट आर्थिक स्थितीमुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, त्यात पदरी दोन मुले या साऱ्या संकटांमुळे अनेक जण खचून जातात. उभे राहण्यासाठी त्यांची धडपड कुठेतरी कमी पडते अन सारेच संपते. असाच प्रसंग आलेल्या, सात वर्षांची असताना आईचे छत्र हरपलं, लग्न होऊन दोन मुलांना वाढविताना पतीचे अकाली निधन यातून सावरत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या चारचाकीच्या टायरचे पंक्चर काढण्याचे पतीचे काम पुढे सुरू ठेवणे साधे काम नाही. (Women Inspirational Story Shattered world healed by puncture repair of four wheeler)