Women League Judo Tournament : नाशिकमध्ये उद्यापासून वूमेन्स लीग ज्यूदो स्पर्धा; 900 खेळाडूंचा सहभाग

Judo Tournament : १ ते ३ सप्टेंबरदरम्यान महिलांच्या पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वूमेन्स लीग ज्यूदो स्पर्धेचे आयोजन केले आहे.
Women League Judo Tournament
Women League Judo Tournamentesakal
Updated on

Women League Judo Tournament : हिरावाडी येथील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे १ ते ३ सप्टेंबरदरम्यान महिलांच्या पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वूमेन्स लीग ज्यूदो स्पर्धेचे आयोजन केले आहे. भारतीय खेल प्राधिकरण आणि खेलो इंडिया यांच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे. जास्तीत जास्त मुलींचा सहभाग वाढावा, यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत ‘अस्मिता वूमेन्स लीग’ या नावाने गेल्या चार वर्षांपासून महिलांसाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. (Women League Judo Tournament from tomorrow)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.