Nashik Silk Industry: जिल्ह्यात पहिल्यांदाच महिलांचा रेशीम उद्योग! कोचरगावच्या हिरकणी बचत गटाच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला फाटा

Latest Nashik News : या रेशीम उद्योगात कोणत्याही पुरुषांचा हस्तक्षेप नसेल. सुरुवातीच्या लागवडीपासून विक्रीपर्यंतचे सर्व काम बचत गटाच्या महिलाच करणार आहेत.
Women of Hirakani Self-Help Group at Kochargaon (Dindori) and others.
Women of Hirakani Self-Help Group at Kochargaon (Dindori) and others.esakal
Updated on

Nashik Silk Industry : दिंडोरी तालुक्यातील जेमतेम लोकसंख्या असलेले कोचरगाव. येथील हिरकणी बचत गटाच्या महिलांना घरातील पारंपरिक शेतीपेक्षा शाश्वत उत्पादन मिळेल, असा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी त्यांनी रेशीम उद्योगाची निवड केली. जेमतेम शिक्षण असलेल्या महिलांना उद्योगाविषयी कोणतीही माहिती नव्हती.

त्यासाठी त्यांनी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट यांच्याकडे प्रशिक्षणाची मागणी केली. विशेष म्हणजे या रेशीम उद्योगात कोणत्याही पुरुषांचा हस्तक्षेप नसेल. सुरुवातीच्या लागवडीपासून विक्रीपर्यंतचे सर्व काम बचत गटाच्या महिलाच करणार आहेत. (Nashik Women silk industry for first time in district)

टीडीके कंपनी आणि अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने बचत गटातील महिला रेशीम उद्योगाला सुरुवात करणार आहेत. प्रशिक्षणात महिलांनी आदिवासी भागात सुरू असलेले उद्योग समजून घेतले.

रेशीम उद्योग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, ज्ञान व कौशल्य आत्मसात केल्यास रेशीम शेती यशस्वी होऊ शकते, यासाठी ‘अभिव्यक्ती’चे भिला ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. रेशीम शेती करणारे हरसूलचे शेतकरी अशोक भोये यांनी आपला अनुभव सांगत महिलांच्या शंकांचे निरसन केले. (latest marathi news)

Women of Hirakani Self-Help Group at Kochargaon (Dindori) and others.
Nashik EVM Awareness LED Van : मतदार जनजागृती नव्हे, पैशांची उधळपट्टी! ‘ईव्हीएम’ जागृतीवर निवडणूक विभागाचा 90 लाखांचा खर्च

"आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बचत गटातील महिलांना पारंपरिक शेतीपेक्षा चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय असावा, असे वाटायचे. त्यासाठी आम्ही रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घ्यायचे ठरविले. आम्ही सर्व मिळून रेशीम उद्योग यशस्वी करून दाखवू."

- संगीता टोकारे, अध्यक्षा, हिरकणी महिला बचत गट

"हिरकणी महिला बचत गटाच्या रेशीम उद्योग करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यासाठी तुतीच्या रोपाची लागवड, उत्पादन, खरेदी-विक्री सर्व कामकाज केवळ त्या पाहतील, त्यात पुरुष कुणीही ढवळाढवळ करणार नाही."- भिला ठाकरे, ‘अभिव्यक्ती’

Women of Hirakani Self-Help Group at Kochargaon (Dindori) and others.
Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.