RTO Worker Strike : ‘आरटीओ’चे काम दुसऱ्या दिवशीही ठप्प; मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप

RTO Worker Strike : विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ( आरटीओ) मधील कामकाज ठप्प झाल्याचे बघायला मिळाले.
Officers and employees giving letter of support to the Motor Vehicle Department Employees Association.
Officers and employees giving letter of support to the Motor Vehicle Department Employees Association.esakal
Updated on

पंचवटी : मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ( आरटीओ) मधील कामकाज ठप्प झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, संपास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा दिल्याने अजूनच या संपाची धार वाढली आहे. विविध मागण्यांसाठी मंगळवार (ता. २४) पासून राज्यभर बेमुदत संपावर हाक दिली होती. (work of RTO stopped on second day as well due to indefinite strike by Motor Vehicle Department Employees Union )

यामुळे ५२ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. राज्यातील सर्वच कार्यालयात विविध कररूपी जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलावरदेखील परिमाण होत आहे. बेमुदत संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती तसेच राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्र मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर यांना राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ तसेच संपर्कप्रमुख श्यामसुंदर जोशी सरचिटणीस तथा राज्य उपाध्यक्ष सुनंदा जरांडे यांनी दिले आहे. स्वराज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कासार सरचिटणीस राजेंद्र अहिरे यांनीही पाठिंब्याचे पत्र मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेला दिले आहे. (latest marathi news)

Officers and employees giving letter of support to the Motor Vehicle Department Employees Association.
Jalgaon Workers Strike : ऊसतोड मजुरांचे आजपासून ‘कोयता बंद’ आंदोलन

महसुलावर परिणाम

प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑनलाइन मिळणाऱ्या महसुलाव्यतिरिक्त परवाना फी, दंड, आकर्षक नंबरच्या माध्यमातून रोज एका कार्यालयात किमान दहा ते पंधरा लाख रुपयांचा रोख महसूल जमा होतो. परंतु मोटर वाहन विभाग संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प झाल्याने एका कार्यालयात जमा होणारा दहा ते पंधरा लाख रुपयांचा महसूल जमा होत असल्याने राज्यातील इतरही कार्यालयांचा महसूल धरला तर कोट्यवधींच्या महसुलावरदेखील परिणाम होत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र, संपामुळे नागरिकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. एजंटांची वर्दळ कायम असल्याचे चित्रदेखील बघायला मिळाले.

Officers and employees giving letter of support to the Motor Vehicle Department Employees Association.
ST Worker Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; 'हा' तोडगा निघण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.