Nashik News : कर्मचाऱ्‍यांच्या आंदोलनामुळे आठवडा ‘पाण्यात’; राज्य शासनाकडील प्रलंबीत मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम

Nashik News : राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे एक आठवड्यापासून कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे.
Revenue Employee Protest
Revenue Employee Protestesakal
Updated on

Nashik News : राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे एक आठवड्यापासून कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. आंदोलनाकडे राज्य सरकारने पाठ फिरविल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले असून, त्यांनी कामबंद आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा सरकारला दिला आहे. (work stoppage called by State Revenue Employees)

अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाऱ्‍यांनी गेल्या पाच दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. सोमवारी (ता.१५) काम बंद आंदोलनामुळे महसूलचे कामकाज ठप्प झाले असून, त्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे दाखलेदेखील प्रलंबीत राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

महसूल कर्मचाऱ्‍यांच्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता. १०) काळ्या फिती लावून कामकाज केले. त्यानंतर आंदोलनातील पुढच्या टप्यांत गुरुवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तर शुक्रवारी (ता. ११) दिवसभर जागेवर बसून लेखणी बंद आंदोलनातून कामकाज ठप्प केले होते.

शनिवार व रविवार दोन दिवस शासकीय सुटी असल्याने महसूलचे कामकाज बंद होते. सोमवारी आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा निघेल, या आशेवर असलेल्या कर्मचारी व नागरिकांचा मात्र हिरमोड झाला. मंत्रालय स्तरावर महसूल संघटनेच्या मागण्यांबाबत बैठकच न झाल्यामुळे संघटनेने सप्ताहाच्या पहिल्याच दिवसापासून पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देत कामकाज बंद ठेवले. (latest marathi news)

Revenue Employee Protest
Nashik News : जि. प.चा वरिष्ठ सहाय्यक बडतर्फ! आर्थिक नियमितता प्रकरणी प्रशासनाची कारवाई

याप्रसंगी महसुल संघटनेचे राज्याध्यक्ष जीवन आहेर, जिल्हाध्यक्ष तुषार नागरे, सल्लागार नरेंद्र जगताप, कार्याध्यक्ष रमेश मोरे, कोषाध्यक्ष अमोल हांडगे, संघटक योगेश नाईक, विनोद बागूल, आदित्य परदेशी यांच्यासह विविध कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

९९६ कर्मचारी संपात

आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयातील ७० लिपिक व ५० अव्वल कारकून सहभागी झाले होते, तर जिल्ह्यातील ३५० लिपिक व ५२६ अव्वल कारकूनांनी सहभाग नोंदवला आहे. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत, अपील विभाग, गृहखाते, आस्थापना, कुळ कायदा विभाग, लेखा विभागांसह अन्य विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.

संघटनेच्या मागण्या

-महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध कर्मचारी कपात न करता लागू करा

- अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती आदेश द्या

-महसुलाचा आकृतिबंध तत्काळ मंजूर करा

- महसूल विभागासाठी कर्मचाऱ्‍यांचा ग्रेड-पे २४०० रुपये करा

Revenue Employee Protest
Nashik News : वीज दरवाढ कमी करण्यात यावी; छवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.