Nashik News : आधी थकीत देणी द्या, मग, हस्तांतरण करा! वसाका मजदूर युनियनचा आंदोलनाचा इशारा

Nashik News : वसाका सहकारी साखर कारखाना परस्पर विक्री करण्याची प्रक्रिया राज्य सहकारी बँकेने सुरू केली असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने कामगार वर्ग अस्वस्थ आहे.
Vasaka Sugar Factory
Vasaka Sugar Factoryesakal
Updated on

देवळा : वसाका साखर कारखाना विक्री करण्यापूर्वी वा कुणाला देण्याआधी या कारखान्यातील कामगारांची थकीत देणी दिली जावी, अन्यथा अशा घडामोडी होण्याच्या दरम्यान आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा वसाका मजदूर युनियनने दिला आहे. वसाका सहकारी साखर कारखाना परस्पर विक्री करण्याची प्रक्रिया राज्य सहकारी बँकेने सुरू केली असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने कामगार वर्ग अस्वस्थ आहे. (Nashik News)

आपण इतक्या दिवस कारखान्यात घाम गाळत अनेक गळीत हंगाम यशस्वी केले. परंतु, या घामाचे दाम मिळत नसल्याने ते नाराज आहेत. वसाका कर्जाच्या खाईत अडकल्याने या कारखान्याची मालमत्ता राज्य सहकारी बँकेने जप्त केलेली आहे. कर्जाची वसुली करण्यासाठी राज्य सहकारी बँकेच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सभासद, कामगारांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सभासदांच्या मालकीचा कारखाना हा सहकार तत्वावर चालवून तो सभासदांच्याच मालकीचा असावा, अशी सभासदांची भावना आहे. तर कारखाना चालू व्हावा, ही कामगारांची इच्छा आहे. असे असले तरी अलीकडे या कारखान्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्षच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मध्यंतरी या कारखान्यावरील काही साहित्य चोरीला गेल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे हा कारखाना चालू होणे ही काळाची गरज आहे. मात्र, कर्जवसुलीसाठी बँकेच्या हालचाली चालू असतील तर त्याआधी आमची थकीत देणी द्यावी, अशी मागणी सरचिटणीस आनंदा देवरे, चिटणीस अशोक देवरे, उपाध्यक्ष नंदू जाधव आदींनी केली आहे. (latest marathi news)

Vasaka Sugar Factory
Nashik News : शेतकऱ्याचा नादच खुळा! ट्रॅक्टर घेऊन लडाखला; तिसगावचा युवा शेतकरी अक्षय इखे 2 मित्रांसह ट्रॅक्टर सफारीला

देय रक्कम ३८ कोटी

वसाका मजदूर युनियनद्वारा दिलेल्या पत्राच्या संदर्भानुसार सहाय्यक कामगार आयुक्तांनी मागील वर्षाच्या अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या पत्रव्यवहारानुसार कामगारांची कारखान्याकडे ३२ कोटी ६५ लाख ७९ हजार ९४७ थकीत घेणी असल्याचे दिसते.

या कारखान्याचे अवसायक अनिल देवकर यांच्या पत्रानुसार ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत निव्वळ देय पगार, ग्रॅज्युईटी रक्कम, रजा पगार, रिटेन्शन, पगारातील कपाती देणे, बोनस देणे अशी एकूण कामगार देय रक्कम ३८ कोटींपेक्षा जास्त असल्याचे त्यांच्या पत्रावरून कळते.

"धाराशिव युनिट, अवसायक व वसाका मजदूर युनियनमधील त्रिपक्षीय करारानुसार यात कामगारांचे घेणे बाकी आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर वसाका मजदूर युनियन कामगारांची थकीत घेणी वसूल करण्यासाठी संघर्षाच्या तयारीत आहे. वसाका साखर कारखान्याचे हस्तांतरण होण्याआधी या कारखान्यातील कामगारांची थकीत देणी दिली जावी, अशी त्यांची मागणी आहे. अन्यथा, अशा घडामोडी होण्याच्या दरम्यान आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल." - रवींद्र सावकार, कार्याध्यक्ष, वसाका मजदूर युनियन

Vasaka Sugar Factory
Nashik News : युएनच्या स्पेशल फोर्समध्ये सहायक आयुक्त पत्की! महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.