नाशिक : दगडी कोळशाला सक्षम पर्याय आणि शंभर वर्षांपर्यंत टिकण्याची क्षमता असलेल्या बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी सहा लाख ९० हजार रुपये अनुदान दिले जात असल्याने या लागवडीकडे शेतकरी वळू लागले आहेत. जिल्ह्यात सहा हजार एकरवर विविध प्रकारच्या बांबूची लागवड करण्यासाठी सुरू झालेले काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. (World Bamboo Day 2024 Growing trend towards bamboo cultivation)