World Honey Bee Day 2024 : मधमाश्यांमध्ये देशाचे अर्थकारण बदलण्याची ताकद! मध उत्पादनात भारत पाचव्या क्रमांकावर

Honey Bee Day : मधमाशी, मधाचे पोळ, मध, मेण आणि मधमाशीचे चावणे एवढाच संदर्भ मधमाशीबरोबर जोडला जातो.
Honey Bee
Honey Beeesakal
Updated on

World Honey Bee Day 2024 : मधमाशी, मधाचे पोळ, मध, मेण आणि मधमाशीचे चावणे एवढाच संदर्भ मधमाशीबरोबर जोडला जातो. परंतु, मधमाशांमध्ये देशाचे अर्थकारण बदलण्याची ताकद असते. याबद्दल फारशी माहिती प्रचलित नसल्याने मधमाश्यांबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. शहराच्या वसाहतींमध्ये मधमाश्यांचे पोळ आढळून आल्यास लगेच पेस्ट कंट्रोलला फोन करून त्यावर औषध फवारणी केली जाते. (Bees have power to change country economy )

या मधमाशा मारल्यानंतर निसर्गाचे नुकसान होते. देशाची अन्नसुरक्षा मधमाश्यांवर अवलंबून असते म्हणून त्यांचे जतन, संवर्धन करणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या आणि निसर्गाचा बिघडलेला समतोल पाहता भविष्यात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा भासणार आहे. पिकांवर केलेली अतिरिक्त फवारणी, जमिनीची ढासळलेला पोत यामुळे मधमाश्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

२०१८ मध्ये भारत सरकारने मधमाशी पालन व्यवसाय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत समाविष्ट केला. जागतिक पातळीवर भारत मध उत्पादनात पाचव्या तर, मधमाश्यांच्या वसाहतींचा संख्येचा विचार करता पहिल्या क्रमांकाचा देश ठरतो. याउलट महाराष्ट्र मधमाशी पालनात पिछाडीवर आहे. राज्यातील एकूण ४५ हजार गावांपैकी केवळ ११०० गावांमध्ये मधमाशी पालन केले जाते.

मधमाशीच्या २० हजारपेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात त्यातील काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मधमाश्या फुलातून मकरंद घेताना त्यापासून परागकण गोळा करतात. त्यामुळे पिकांचे आपोआप परागीवहन होते आणि पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होते. मधमाश्यांचा महत्त्वाचा गुण एकदा ज्या फुलांवर बसतात त्याच फुलांवर दिवसभर बसतात. फळबागा, भाजीपाला उत्पन्नात मधमाशीचा महत्त्वाचा रोल असतो. (latest marathi news)

Honey Bee
World Bee Day : २० मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून केला घोषित

फक्त त्याचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असते. केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते. मधमाशी पालन शेतीला पूरक व्यवसाय आहे. समजा, पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला दोन लाखाचे उत्पन्न शेतीतून मिळत असेल तर मधमाशी पालनातून त्याला एक लाख उत्पन्न मिळू शकते.

संवर्धन काळाची गरज

दरवर्षी नाशिक जिल्ह्यात ५ ते ७ हजार मधमाश्यांच्या वसाहती पराग भवनासाठी वापरल्या जातात. आता खरबूज, टरबूज, फळभाज्या, भाजीपाला पिकांसाठी मधमाशी पराग भवनासाठी शेतकरी मधमाश्यांच्या वसाहती वापरायला सुरवात केली आहे. म्हणायला मधमाशी छोटा कीटक आहे पण हजारो, लाखोंच्या संख्येने एकत्र आल्यास देशात मधुक्रांती घडून येवू शकते. मधमाशी तिचे काम मोफत करते फक्त तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.

''मधमाशी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रचार प्रसाराचे काम केले जाते. नवीन पिढीला मधमाश्यांचे महत्त्व कळावे म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून २०२३ साली ४६ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्राची भेट घडवून आणली. मधमाशी पालन निसर्ग, आरोग्य, रोजगार, पर्यावरण, शेतीच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आहे. शहरात मधाचे पोळ आढळल्यास केंद्राला संपर्क केल्यास आमची तज्ञ मंडळी त्या ठिकाणी जाऊन मधमाश्यांना जंगलात सोडण्याचे काम करतात.''-नितीन कराळे, व्यवस्थापक व प्रशिक्षक, मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र, पिंपळगाव

कधीपासून सुरवात झाली?

अंतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिका पालन तज्ज्ञांचा २० मे १७३४ ला स्लोव्हानिया देशात एका गरीब कुटुंबात जन्म झाला. १७७१ मध्ये त्यांनी मधुमक्षिका पालनावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले. १७६६ मध्ये युरोपात पहिले मधमाशी पालन केंद्र सुरू केले. त्यांच्या या कार्याची दखल म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने २० मे २०१८ पासून २० मे जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला.

Honey Bee
World Honey Bee Day 2024 : चुंचाळेत मोह फुलांच्या संपर्कातून मध तयार करण्याचा यशस्वी प्रयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()