World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

World No Tobacco Day : जिल्हा शासकीय रुग्णालयाने गेल्या दोन वर्षात जिल्हाभरात तब्बल दीड लाखांपेक्षा अधिकांचे समुपदेशन केले आहे.
World No Tobacco Day
World No Tobacco Dayesakal
Updated on

World No Tobacco Day 2024 : तोंडात चघळत-चघळत तंबाखू व गुटख्याची पिचकारी मारताना व नाका-तोंडावाटे सिगारेट/बिडी ओढून हवेत धुर सोडत ‘हिरोगिरी’ करताना खूप तरूण दिसतात. मात्र, त्याचवेळी, जीवघेण्या कर्करोगाची दोन हात करणार्या रुग्णांची अवस्था पाहिल्यानंतर त्या वयात केलेली हिरोगिरीने त्याचे काय-काय हिरावले असेल तर त्या अंथरुणावर खिळलेल्या रुग्णालाच ठाऊक असते. ( Counseling on one lakh in 2 years from Health department)

त्यामुळे या व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाने गेल्या दोन वर्षात जिल्हाभरात तब्बल दीड लाखांपेक्षा अधिकांचे समुपदेशन केले आहे. मनुष्यबळाअभावी दंडात्मक कारवाईला (कोटपा) मर्यादा असली तरी, तंबाखूच्या व्यसनावर मात करणे शक्य असून, त्यासाठी केवळ मानसिक दृढनिश्चयाची गरज आहे. तंबाखू/गुटखा, बिडी/सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी एकदाच दृढनिश्चय करा...

जिल्हा शासकीय रुग्णालयाअंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. जिल्ह्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण हे तंबाखू, गुटख्याचे व्यसन केल्याने आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष मोहीम राबविली जाते. जिल्हा रुग्णालयाअंतर्गत जिल्हाभर ३२ समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी तंबाखू/गुटख्याचे व्यसन असणार्यांसाठी समुपदेशन केले जाते. याअंतर्गत २०२२-२३ यावर्षात ७३ हजार ७७२ तर, २०२३-२४ या वर्षात ६६ हजार ८६० तर, गेल्या एप्रिल महिन्यात ५ हजार ४४९ जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे. (latest marathi news)

World No Tobacco Day
World No Tobacco Day 2022 : धूम्रपान तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकते

आरोग्य विभागाने यंदा ‘तंबाखू उत्पादनापासून मुलांचे संरक्षण’ या ब्रीदवाक्यावर (थीम) आधारित उपक्रम राबविले जाणार आहेत. यासाठी वर्षभर शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाविरोधात जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. व्यसनमुक्तीसाठी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये जागोजागी भिंतीपत्रके लावण्यात आलेली आहेत.

तंबाखुची आठवण येताच, हे करा...

- तंबाखू खाण्याऐवजी कुरमुरे, शेंगदाणे, बडीशेप, लवंग, काकडी, गाजर खा

- मनात १ ते १०० पर्यंत अंक मोजा

- स्वत:ला इतर कामात गुंतवा

- जीवनातील आनंदी क्षण आठवा

- मनोरंजनात्मक कार्यक्रमात वेळ घालवा

- व्यायाम, प्राणायाम करा

- मित्रांसोबत गप्पा मारा

- एकमेकांना शेअर करा

- शरीरातील विषारी रसायने बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या

World No Tobacco Day
World No-Tobacco Day : तंबाखूमुळे दरवर्षी नऊ लाख जणांचा मृत्यू

कोटपा कार्यवाहीला मर्यादा

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सिगारेट ओढण्यास मनाई असून, त्याविरोधात कोटपाअंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने कोटपाच्या कारवाई करण्यास मर्यादा पडते. तरी पोलीस व एफडीएच्या मदतीने भरारी पथकामार्फत कारवाई केली जाते.

कोटपाची कारवाई

वर्ष.....कारवाई......दंड

२०२२-२३....५४०.....२१,३८० रु.

२०२३-२४...४९९....४२७९९ रु.

२०२४ (एप्रिल)... ५०...१४७१५ रु.

व्यसनमुक्ती समुपदेशन

वर्ष.........समुपदेशन

२०२२-२३...७३७७२

२०२३-२४....६६८६०

२०२४ (एप्रिल)....५४४९

एकूण.....१४६०८१

''तंबाखू/गुटख्याचे व्यसनावर मात करणे शक्य आहे. त्यासाठीच समुपदेशन केले जाते. मनाचा निश्चय केला तर त्यातून वेळीच बाहेर पडता येणे शक्य आहे. अन्यथा एका ठराविक वेळेनंतर त्याचे दुष्परिणाम हे भयंकर असतात. यासाठी लहान वयापासून अशा व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.''- डॉ. शिल्पा बांगर, विभाग प्रमुख, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण, जिल्हा रुग्णालय.

World No Tobacco Day
World No Tobacco Day : राज्यातील चार लाख नागरिक व्यसनाच्या विळख्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.