World No Tobacco Day : गुटखा, तंबाखू ,धूम्रपान या तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे व्यसन असणाऱ्या स्त्री- पुरुषांना व्यसनापासून मुक्तता मिळविण्याची इच्छा असते. तसे प्रयत्नही केले जातात परंतु, व्यसन कसे हाताळावे, याची कल्पना नसल्याने व्यसन सोडविण्याचे मोठे आवाहन सध्या समाजासमोर आहे.
समाजात ३५ टक्के पुरुषांना तंबाखूजन्य पदार्थ सेवनाची सवय असते, तर महिलाही व्यसन करण्यात मागे नाही. त्यासाठी वर्षभरापासून निकोटीन ॲनानिमस संस्था तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सोडविण्यासाठी मदत करते. (Nashik World No Tobacco Day)
दर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात व्यसन सोडण्याची इच्छा असणारे सदस्य व त्यांचे कुटुंबीय एकत्र येतात. एकमेकांचे अनुभव शेअर करतात. संस्थेचा सदस्य होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. केवळ तंबाखूजन्य पदार्थांची सवय सोडण्याची इच्छा असणे एवढीच अट असते.
संस्थेने गेल्या वर्षभरात २५ पैकी १५ सदस्यांना व्यसनापासून मुक्तता मिळवून देण्यात यशस्वी झाल्याचे संस्थेचे संस्थापक डॉ. प्रमोद महाजन यांनी सांगितले. व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी आयुष्यभराचे आवाहन असते. व्यसन सोडणाऱ्या व्यक्तीला त्याचे मित्र व्यसन कधीही सोडू देत नाही.
भेटल्यावर चेष्टा करणे, व्यसनाचे आकर्षण, समोर तंबाखू खाताना बघणे, सततच्या नकारात्मक घटनांमुळे मन व्यसन करण्यासाठी बहाणे शोधत असते. मग पावले आपोआप व्यसनाकडे वळतात. दारू सोडणे सोपे कारण त्याचा त्रास शरीरावर परिणाम होतो, तर तंबाखू सोडणे पूर्णपणे मानसिकतेवर अवलंबून असते. व्यसन सोडविण्यासाठी प्रयत्न खूप केले जातात, परंतु त्यात यशस्वी होणे सोपे नसते. ते आयुष्यभराचे आवाहन असते.
आसक्तीपासून मुक्ती
व्यसन सोडविण्याचे कोणतेही औषध नसते तर, व्यसन सोडताना जो त्रास होतो. त्यावर डॉक्टरांच्या औषधांची मदत मिळू शकते परंतु, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सोडविण्यासाठी इच्छाशक्ती पुरेशी नसून व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांच्या आधाराची व समजून घेण्याची गरज असते.
अशावेळी कसे वागावे, काय बोलावे, कसा विचार करावा, मन कसे शांत ठेवावे यासाठी ज्या सदस्यांनी व्यसन सोडले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी संस्थेतील सदस्य एकमेकांना मदत करतात. संस्थेचा प्राथमिक उद्देश्य नेहमी संयमी बनून जगणे व इतरांना संयमी बनण्यास मदत करून त्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या आसक्तीपासून मुक्ती देणे हा आहे.
"व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याची ऊर्मी इतक्या मोठ्या प्रमाणात येते की, ते सहज शरण जातात. व्यसन करण्याची इच्छा नसली तरी तरी ते सेवन करतात. व्यसन सोडविणे पूर्णपणे मानसिक आरोग्यावर अवलंबून असते."
- डॉ. प्रमोद महाजन, संस्थापक, निकोटीन ॲनानिमस संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.